नवरात्रीत देवी आईला प्रसन्न करणे काही अवघड नाही. भक्तिभावाने देवीची उपासान केल्याने देवीचा आशीर्वाद मिळतो. त्याच प्रकारे नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीला वेगवेगळं नैवदे्य दाखविण्याचे देखील विधान आहे. म्हणून नवरात्रीत दर तिथीला देवीला ठराविक नैवदे्य दाखवून आपल त्यांची आराधना करु शकता.
* नवरात्राच्या पहिल्या दिवशी देवी आईला साजूक गायीचं तूप अर्पित केल्यानं चांगल्या आरोग्याचा आशीर्वाद मिळतो, आणि आपलं शरीर निरोगी राहतं.
* नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी देवीच्या चरणी साखरेचा नैवेद्य द्यावा आणि ती साखर घरातील सर्व लोकांना द्यावी. असे केल्यानं वय वाढते.
* नवरात्राच्या तिसऱ्या दिवशी दूध किंवा दुधापासून बनवलेल्या खिरीचे नैवेद्य देवीआईला दाखवून ती एखाद्या ब्राह्मणाला दान करावी. यामुळे दुःखाचा नाश होऊन आनंदाची प्राप्ती होते.
* नवरात्राच्या चवथ्या दिवशी देवी आईला मालपुआचा नैवेद्य दाखवावा आणि देऊळातील ब्राह्मणाला दान द्यावे. यामुळे बुद्धी कौशल्य विकसित होऊन निर्णय घेण्याची क्षमता वाढते.
* नवरात्राच्या पाचव्या दिवशी देवी आईला केळ्यांचा नैवेद्य दाखवावा. यामुळे शरीर निरोगी राहतं.
* नवरात्राच्या सहाव्या दिवशी देवी आईला मधाचा नैवेद्य दाखवावा. ज्यामुळे आपल्या आकर्षण शक्तीत वाढ होईल.
* नवरात्राच्या सातव्या दिवशी देवी आईला गुळाचा नैवेद्य दाखवून ब्राह्मणाला दान दिल्याने शोक दूर होतात आणि अचानक आलेल्या संकटापासून संरक्षण होते.
* नवरात्राच्या आठव्या दिवशी माते राणीला नारळाचा नैवेद्य दाखवून नारळ दान करावे. यामुळे मुलांशी निगडित अडचणी दूर होतात.
* नवरात्राच्या नवव्या दिवशी तीळाचा नैवेद्य दाखवावा. आणि ते ब्राह्मणाला दान द्यावे. यामुळे मृत्यूच्या भीतीपासून आराम मिळेल. त्याचबरोबर अघटित घटनांपासून देखील संरक्षण होईल.