Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवरात्रात कुंकवाला महत्त्व

नवरात्रात कुंकवाला महत्त्व
हरिद्रा: स्वर्ण वर्णाभा सर्वसौभाग्दानिी।
सर्वालंकार मुखहि देवित्वं प्रतिगृह्यताम्।।
 
नवरात्रोत्सव म्हणजे स्त्रिांच व्रतांचा समूह. नवरात्री विविध रंगांनी विविध फुलांनी सजविल्या जातात. पहिल्या दिवसापासूनच नवदुर्गाची पूजा बांधण्याची पद्धत सर्वदूर पसरलेली आहे. देवीला सर्व अलंकारांनी सजविले जाते. नऊ दिवस तिच्या अवतारांप्रमाणे तिची वस्त्रे, अलंकार असतात. नवरात्रात हळदी-कुंकवाला खूप महत्त्व आहे. प्रत्यके स्त्री ही देवी समान मानून तिला, तिचा हळदी-कुंकवाचा मान-सन्मान दिला जातो.
 
हळद आणि कुंकू ही खास सौभाग्यद्रव्ये समजली जातात. सौभाग्वती स्त्रिया आपल्या कुंकवाला फार जपतात. ते त्यांचे सौभाग्यप्रतीकच असते. तिसर्‍या, चौथ्या शतकापासून वाङ्मयात कुंकवाचे उल्लेख आढळतात. रघुवंशात, भर्तृहरीच्या शृंगार शतकात व अमरूशतकात कुंकुमतिलकाचा उल्लेख आढळतो. पण तिसर्‍या, चौथ्या शतकात रंगविलेल्या अजंठय़ाच्या स्त्रीचित्रांमधूनही स्त्रिांच्या कपाळी कुंकू क्वचितच  दिसते. विदुर-जातकाच्या चित्रीकरणात इरंधतीच्या कपाळी कुंकवाची टिकली दाखविलेली आहे.
 
इ.स. सातव्या, आठव्या शतकानंतरच वाङ्मयात कुंकवाचे उल्लेख मोठय़ा प्रमाणात आढळतात. तंत्र वाङ्मात तर कुंकुमतिलकाला विशेष महत्त्व आहे. ग्रामदेवतांना कुंकू तर फार प्रिय असल्याचे उल्लेख विपुल आहेत. दुर्गापूजेतही कुंकवाचे आधिक्य असते. सप्तमातृकांनाही कुंकू प्रिय आहे.
 
कुंकू हे सौभाग्य प्रतीक समजले गेल्यामुळे भारतीय संस्कृतीत त्यांचा अनेक कार्यात वापर सुरू झाला. ते स्त्रिांचे अहेव लेणे ठरले. जिच्या   कपाळी कुंकू नाही, ती अशुभ समजली जाऊ लागली. कुमारिका व सधवा स्त्रिया यांनाच कुंकू लावण्याचा अधिकार दिला गेला. देवपूजेत कुंकू आवश्यक ठरले. लग्नपत्रिकेला कुंकू लावून मग ती आप्तेष्टांना पाठविण्याची पद्धत रूजू झाली. हिंदू स्त्रिया नवे वस्त्र वापरायला काढताना त्याला प्रथम कुंकू लावतात. कुंकू हे सुवासिनींला सुवासिनीनेच लावायचे असते. लग्नप्रसंगी कित्येक जातीत वधूच्या कपाळी कुंकवाचा मळवट भरतात. सुवासिनी घरातून बाहेर पडताना घरची गृहिणी तिला कुंकू लावते. मंगल करत पुरुषांनाही कुंकू लावले जाते. सधवा स्त्रीच्या जाण्यानंतर तिला पूज्य मानले जाते.
 
आजच्या विज्ञानाच्या युगातही भारतात कुंकू लावण्याची पद्धत अद्यापि टिकून आहे. ते लावण्याच्या पद्धतीत मात्र कालानुसार बदल होत गेला आहे. मात्र अजूनही हळदी-कुंकू व मांगलिक समारंभ यात अस्सल कुंकूच वापरतात.
 
विठ्ठल जोशी 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

म्हणून केले जाते गणेश प्रतिमेचे विसर्जन