Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्री तुळजाभवानी माहात्म्य - अध्याय ३

श्री तुळजाभवानी माहात्म्य - अध्याय ३
, मंगळवार, 12 जानेवारी 2021 (17:03 IST)
श्रीगणेशायनमः ॥ जयजयभक्तप्रतीपाळनी ॥ जयजयदुष्टविध्वंसिनी ॥ दुर्गेदुर्घटहारिणी ॥ भवतारणीनमोतुज ॥१॥
शिवम्हणेवरिष्ठमुनी ॥ देवीचीप्रार्थनाकरूनी ॥ मौनेंचीराहिलीद्विजपत्नी ॥ हातजोड़ुनीउभीअसे ॥२॥
अनुभूतीचेंगमनोगत ॥ जगंदबाजाणोनीत्वरीत ॥ बरेंम्हनोनीधावत ॥ कुकुरदानवावरीतेव्हां ॥३॥
धनुव्यटनत्कारीलेथोर ॥ नादेगर्जलेंतेव्हाअंबर ॥ त्यासवाणलाउनसत्वर ॥ दानवहृदयीविंधिला ॥४॥
हृदयीखडतरलागलाबाण ॥ तेव्हांदानवकोपलादारुण ॥ सोडिताजाहला असंख्यबाण ॥ देवीवरीअतिवेगे ॥५॥
पुढेंसरसाउनवेगें ॥ बाणसोडीतबाणामार्गे ॥ अनेकशस्त्रास्त्र मुष्टिप्रयोगें ॥ वृष्टिकरितेधवां ॥६॥
देवीसीकरूनशस्त्रप्रहार ॥ आलायोगिनीगणासमोर ॥ नानाशस्त्र जाळभयंकर ॥ सोडुनिमारितमुष्टिघाते ॥७॥
पृथकपृथकयोगिनीसी ॥ प्रहारकरोनीवेगेसी ॥ सवेची कोपधरोनीमानसी ॥ देवीजवळीपातला ॥८॥
तीक्ष्णशक्तिघेऊनहातांता ॥ जगदम्बेसीप्रहारकरित ॥ मगतीदेवीकोपोनीहातांत ॥ शुळझडकरीघेतसे ॥९॥
दानवाच्याहृदयावर ॥ अतिआवेशेंकेलाप्रहार ॥ तेणेंव्याकुळझालाकुकुर ॥ दानवाधमतेकाळीं ॥१०॥
हृदयींच्यथाझालीथोर ॥ मग असुरीमायापसरुनी सत्वर ॥ दानवरूपटाकुनझडकर ॥ अश्वरूपधरियलें ॥११॥
ठाणमानशोभेअत्यंत ॥ अश्वजातीचा शब्दकरित ॥ भयंकरखेखाळफिडीत ॥ चपळधावतचहुंकडे ॥१२॥
अतिवेंगेआकाशांत ॥ उड्डाण करीअकस्मात ॥ मुत्रकरोनीलेंड्यासोडीत ॥ हयरूपधारीदानव ॥१३॥
श्रीजगंदंबाअंतर्साक्ष ॥ म्हणे हामायावीप्रत्यक्ष ॥ तरीयाचावधकरावयासमक्ष ॥ सर्वपाहतीलयेवेळीं ॥१४॥
मगपांचबाणेंकरूनी ॥ ताडिलेदानवांतेचक्षणीं ॥ मगतोहयरूपसोडोनी ॥ अन्यरूपधरीतात्काळ ॥१५॥
महिषरूपधरोनिथोर ॥ येतसेजगदंबेसमोर ॥ उभयशृंगीपर्वतशिखर ॥ धरूनिफेकितबहुबळे ॥१६॥
योगिनीचासमुदायबहुत ॥ पाहुनीशिळावृष्टीकरित ॥ मागीलचरणीभूमीउकरित ॥ जवळयेतदेवीच्या ॥१७॥
मगजगदंबाअति त्वरीत ॥ त्यावरीशरवृष्टिकरित ॥ तेणेंहोऊनभयभीत ॥ महिषरूपसोडिलें ॥१८॥
मगतोसिंहझालाप्रचंड ॥ क्रोधेगर्जेअखंड ॥ पुच्छफिरवूनउदंड ॥ मस्तकावरीधरितसे ॥१९॥
भैरवगणपाहूनबहुत ॥ त्यासीतीक्ष्ण देतानेंचावत ॥ तीव्रनखेंप्रहारकरित ॥ कोपयुक्तहोउनी ॥२०॥
तेव्हांदेवीनेंतात्काळ ॥ त्याच्याहृदयीं मारीलाशुळ ॥ तेणेंतोहौनीविव्हळ ॥ सिंहरूपसोडिलें ॥२१॥
पुरुषरूपधारिलेंथोर ॥ रथारुढझाला धनुर्धर ॥ मुगुटेंखोचलेंअंबर ॥ एवढेविशाळरूपधरिलें ॥२२॥
धनुष्यालावूनाआठबाण ॥ देवीवरी सोडीलेंदारुण ॥ तिनेंतात्काळछेदुन ॥ वरचेवरीटाकीले ॥२३॥
होउनीजगदंबाक्रोधयुक्त ॥ दिव्य शंखघेउनीहातांत ॥ मुखेंवाजविला त्यानें अत्यंत ॥ नादगगनांतकोदला ॥२४॥
धनुष्यासीलाउनीशर ॥ सोडिलेबहुतातिसत्वर ॥ तेणेंरथझालाचुर ॥ चारीअश्वमारिले ॥२५॥
मेलासारथीतुटलाध्वज ॥ छत्रदांड्यासीवळसहज ॥ साठाचाकेंकवचसतेज ॥ सर्वहीनाशातेपावले ॥२६॥
मगबाणभातेमुगुटासहित ॥ एकबाणसोडुनीनाशिलेनिश्चित ॥ संग्रामसामुग्रीकिंचित ॥ राहिलीनाहींतेधवां ॥२७॥
मग तोमायावीदानवकुकूर ॥ सैन्यनिर्मिताझालाअपार ॥ हस्त्रीरथाश्वपदातीवीर ॥ चतुरंगसेनातेकाळीं ॥२८॥
महाबलपराक्रमीशुर ॥ युद्धकरुंलागलालेंघोर ॥ देवीचेंसैन्यतेव्हांसमग्र ॥ शस्त्रवृष्टीनेंझाकिलें ॥२९॥
भैरवयोगिनीवृदंतेवेळें ॥ आच्छादिलेंशस्त्रजाळें ॥ जिकड़ेतिकड़ेदानवबळे ॥ जगतितळींव्यापिलें ॥३०॥
ऐसेंमायावसैन्यसर्व ॥ त्यांतमुख्यकुकूरदानव ॥ संग्राममांडिलाअभिनव ॥ शस्त्रसंपांतकरताती ॥३१॥
त्वरितादेवीपरमेश्वरी ॥ प्रवर्तलीमहामारी ॥ सैन्यनासुनीक्षणाभिंतरी ॥ कुकुरासन्निधपातले ॥३२॥
घेऊनअर्धचंद्राकारशर ॥ तेणेंछेदिलेंकुकुराचेंशिर ॥ तंवत्यचेकंटातुनसत्वर ॥ दुसरापुरुषनिघाला ॥३३॥
तुलजेनेंपाहुनतयाला ॥ सवेंचखिंगगेंताडिला ॥ तवतोधरणीवरीपडिला ॥ गतप्राणहोउनी ॥३४॥
शरीरभूमीवरीपडिलें ॥ तेणेंभूमंडळचलनपावलें ॥ यापरीदैत्यासी मारिले ॥ जगदंबेनेतेवेळीं ॥३५॥
गणगर्जतीजयजयकार ॥ उदयोस्तुम्हणतीवारंवार ॥ आनंद्प्रवर्तलाथोर ॥ हर्षनिर्भरनाचती ॥३६॥
तेकाळींभैरवसकळ ॥ योगीनीवृंदग्रहाचामेळ ॥ भुतवेताळकंकाळ ॥ रेवतीवृद्धरेवती ॥३७॥
अतिहर्ष धांवतेझाले ॥ मायिकसैन्यासीभक्षूंलागले ॥ गजीवजीनरजेअसुरेनिर्मिले ॥ त्यांसीभक्षिलेयथेष्ट ॥३८॥
रक्तासीघटघटापिती ॥ मज्जाचाटोनीयाखाती ॥ मांसगटगटागिळीती ॥ चघळुनीटाकिती हाडांतें ॥३९॥
आंतडेंमाळाकंठींघालिती ॥ तेणेंआपणाशोभविती ॥ निर्मळलिकैरणक्षिती ॥ सर्वकलेवरे भक्षुनी ॥४०॥
मारुनीदानवेश्वर ॥ परतलीअंबासपरिवार ॥ आलीअनुभूतीसमोर ॥ सुखाअपार द्यावया ॥४१॥
वरिष्ठासीम्हणतीशंकर ॥ देखोनिगणदेवतासंभार ॥ अनुभूतीकरीनमस्कार ॥ करजोडोनीतेधवां ॥४२॥
तुलजादेवीसीप्रेमभरित ॥ साष्टांगनमस्कारकरीत ॥ म्हणेजयदेवीकृपावंत ॥ जगज्जननीदयाळे ॥४३॥
त्वांपराक्रमकेलाअदभुत ॥ माझेंकार्यकेलेंत्वरीत ॥ तुजभ्यांश्रमविलेबहुत ॥ शिणलीसमायबहिणी ॥४४॥
दानवेमजलादूःखदिधलें ॥ म्हणोनीतुजभ्यांकष्टविले ॥ क्षमाकरीदीन वत्सले ॥ तुळजाबाईजिवलगे ॥४५॥
मीतरीतुझेंलेंकरूंदीन ॥ अनुग्रहपात्राअहेजाण ॥ तरीतुझ्याप्रसादेकरुन ॥ परमगतीसीपावेनकीं ॥४६॥
अंबाम्हणेतेअवसरीं ॥ ऐकप्रेमळेद्विजसुंदरीं ॥ तुझें कल्याणपरोपरी ॥ सर्वदाअसोमत्कृपें ॥४७॥
इच्छिसीतोदेईनवर ॥ जरीतोअसेलदुष्कर ॥ माझेंबचन सत्यनिर्धार ॥ मागेवरतुंआतां ॥४८॥
मागसीतोवरदेइन ॥ हेंतरीअसेंअल्पवचन ॥ परित्वांजेस्तविलें अष्टककरुन ॥ त्याचेंपठणश्रवणकरितीजे ॥४९॥
त्यासीदेईनसायुज्यमुक्ति ॥ आणियालोकींधनसंपत्ति ॥ पुत्रपौत्रसहनांदती ॥ सुखभोगितीअपार ॥५०॥
विद्यावानकुलसंपन्न ॥ दीर्घायुषीहोयजाण ॥ निरंतर सुखेसुखहोऊन ॥ नांदतीलनिःसंशय ॥५१॥
जगदंबेचेंप्रसादवचन ॥ ऐकोन अनुभतीकरीविनवन ॥ देवोतुझेंपादसेवन ॥ अखंडभजनमजद्यावें ॥५२॥
तुझ्यापादसेवनापरतें ॥ नाआवडेमजजगन्माते ॥ चरणसेवेपुढे़मुक्तितें ॥ तुच्छमानितेजगदंबे ॥५३॥
कर्मानुबंधेपुढतपुढतीं ॥ भलतीकुळीभलतेयाती ॥ जन्महोतीलतेथेंभक्ति ॥ तुझीचासोअखंड ॥५४॥
शंकरम्हणतीवरिष्ठमुनी ॥ सुप्रसन्नाआदि भवानी ॥ अनुभुतीसीमधुरवचनी ॥ तथास्तुम्हणोनीबोलत ॥५५॥
धन्यधन्यतीअनुभूति ॥ धन्यधन्यतिचीभक्ति ॥ तिचेनियोगेसच्चिन्मूर्ति ॥ प्रगटझालीभूतळीं ॥५६॥
अनुभूतीचिमनोगत ॥ श्रवणकरोनीनिश्चित ॥ मगबटुभैरवासीत्वरित ॥ आज्ञाकरितभद्रकाळीं ॥५७॥
सह्याचलदुरप्रांत ॥ यमुनाअलातिविख्यात ॥ तेथेंमीराहिननिश्चित ॥ तरीतुवांत्वरीततेथेंजावें ॥५८॥
पर्वतस्थानींस्थळयोजून ॥ शीघ्रयेईगापरतोन ॥ भैरवाइकोनीदेवीवचन ॥ दक्षिणदिशेसीनिघाला ॥५९॥
यमुनाचलभैरवेदेखिला ॥ सुवर्णरत्नशिखरेंशोभला ॥ धातुमणिक्यरत्नेरंजिला ॥ देखोनीझालाविस्मिता ॥६०॥
पर्वतासक्तझालेंमानस ॥ तेथेंचराहिलाबहुदिवस ॥ विसरलादेवी आज्ञावचनास ॥ परतोनी गेलानसेची ॥६१॥
काळलोटलाबहुत ॥ जगदंबातरीवाटपाहत ॥ मेरूपर्वतीगणासहित ॥ विचार करितवैसली ॥६२॥
जगदंबेनेतेवेळे ॥ तामसीदेवीसविचारले ॥ तिचें अनुमोदनघेतलें ॥ यमुनाचळा जावया ॥६३॥
तेव्हांश्रोतोविचक्षण ॥ म्हणतीतामसीदेवीकोण ॥ तिजसवेविचारकेलाकोन ॥ हे आम्हासीकळावें ॥६४॥
तरीऐकाजगदंबाकोण ॥ हेआधींघ्यावेंसमजोन ॥ मगतामसीदेवीचेंज्ञान ॥ सहजहोईलतुम्हासी ॥६५॥
जेगुनातीतससच्दिद्धन ॥ वेदांतवेद्यब्रह्मपूर्ण ॥ तेथेभासेमायीकत्रिगुण ॥ निळीमाजेवींआकाशी ॥६६॥
शुद्धसत्वमायाजाण ॥ तद्वत्छीन्नजेंचैतन्य ॥ सर्वज्ञादिगुणसंपन्न ॥ ते स्वरुपपूर्णजगदंबा ॥६७॥
मिश्रितजोत्रिगुण ॥ हे अविद्येंचेंलक्षण ॥ तद्वत्छीन्नजेंचैतन्य ॥ जिवम्हणतीतयासी ॥६८॥
अविद्येच्याबहुतव्यक्ति ॥ गुणतारतम्येअसती ॥ म्हणोनीजिवाहिवहुतहोती ॥ सुरासुरनरतीर्थगादी ॥६९॥
जिवअज्ञानेभ्रमले ॥ तेंकामकर्मैंवेष्टीलें ॥ सुक्ष्मस्थुलदेहेआवरले ॥ अनेकयोईफिरताती ॥७०॥
जिवाच्याकर्मानुसार ॥ सृष्टिस्थिती आणि संहार ॥ मायायोगहोती व्यापार ॥ इससत्तेनेंजाणीजें ॥७१॥
मायेचीप्रवृत्तीनिवृत्ति ॥ करावयासमर्थपर शक्ति ॥ गुणयोगेअवतारघेती ॥ कार्यपरत्वेंअनेक ॥७२॥
मारावयामातंगअसुर ॥ तामसीदेवीगुणावतार ॥ पुढीलकार्याचा विचार ॥ तिजसीकरितजगदंबा ॥७३॥
जेश्रोतसिशंयेविचारले ॥ त्याचेंउत्तरतेंहेदीधलें ॥ आतांपुढेंकायवर्तलें ॥ तेंऐकावेंसादर ॥७४॥
प्रमदोत्तमाजीदेवीतामसी ॥ तिजसवेंघेउनीवेगेसी ॥ योगिनी ग्रहादिगणासी ॥ घेउनचाललीजगदंबा ॥७५॥
श्रीरामायोघ्यावासी ॥ जोआला आहेपंचवटीसी ॥ सिताशुद्धीकरावयासी ॥ यमुनाचलायेईल ॥७६॥
तयासीदर्शनद्यावें ॥ आपणत्यासीअवलोकावें ॥ उत्कंठाधरुनप्रेमभावें ॥ यमुनाच लापातली ॥७७॥
आज्ञापुनीज्याभैरवासी ॥ पुर्वीधाडिलाहोतात्यासी ॥ पुसोलागलीवेगेसी ॥ विलंबकेलाम्हणोनी ॥७८॥
यमुनाचळाजाउन ॥ सत्वरयेइस्थळपाहुन ॥ ऐसीतुज आज्ञाकेली असोन ॥ येथेंचबहुदिनसरमलासी ॥७९॥
सांगसांगयाचेंकारण ॥ नाहींतरीतुजशापीन ॥ ऐसेंऐकोनदेवीवचन ॥ भैरवबोलततेधवां ॥८०॥
मातेतुझीआज्ञाघेउन ॥ सत्वरयास्थळा आलोजाणा ॥ येथीचें आश्चर्यभापाहुन ॥ माझेंमनबहुरमलें ॥८१॥
मीयेथेराहिलोबहुदिन ॥ विसरलोंतुझें आज्ञावचन ॥ हाअपराधमाझापूर्ण ॥ क्षमाकरीहोजगंदंबे ॥८२॥
शंकरम्हणतीतयेक्षणीं ॥ भैरवाचेवचऐकोनी ॥ तुळजामाताकृपेचीखाणी ॥ क्षमाधरेसीजिच्यायोगे ॥८३॥
मगदेवईनेंहास्यकेलें ॥ स्वहस्तेंत्याचेंशरीरे ताडिलें ॥ टोळभैरवनामझालें ॥ तयीपासोनीप्रसिद्ध ॥८४॥
जगदंबायमुनापर्वती वासकरितीझाली निरुती ॥ श्रीरामदर्शनाचीचित्ती ॥ इच्छाधरोनीसप्रेमें ॥८५॥
पुढीलाध्यायींकथासुरस ॥ श्रोते ऐकावेंसावकाश ॥ विनवीपांडुरंगजनार्दनदास ॥ नम्रसंतांससर्वद ॥८६॥
इतिश्रीस्कंदपुराणे सह्याद्री खंडे ॥ तुरजामाहात्म्ये ॥ शंकरवरिष्ठसंवादे ॥ तृतीयोध्यायः ॥३॥
श्रीजगंदबार्पणमस्तु ॥ शुभंभवतु ॥

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्री तुळजाभवानी माहात्म्य - अध्याय २