Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Navratri 2023 : स्तुती सुमने आई मी,उधळली

jagdamba mandir
, शनिवार, 21 ऑक्टोबर 2023 (23:26 IST)
स्तुती सुमने  आई मी,उधळली ,
वाहिली श्रद्धे ची ग श्रद्धांजली,
आळविले तुजला प्रेमभरे सर्वदा,
भाकली करुणा  तुझी ग सदा!
पुजली नित्य मी  तुझी पाऊले  ,
गीत तुझ्या साठीच ग गायिले,
आरती ओवाळून धन्य धन्य जाहले,
 अखंड ज्योत लावून नवरात्र मांडले,
खणा नारळा ने ओटी तुझी भरून,
सौभाग्याचे लेणं तुजला देऊन,
पदरी आनंद घेऊन, सहर्षे मी नाचली,
आई जगदंबे , सेवेने तुझ्या भावविभोर गे झाली!!
..अश्विनी थत्ते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Navratri : आई जगदंबे पाव तू मजला आई श्री जगदंबे