Shardiya Navratri 2023: शारदीय नवरात्रोत्सव 15 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. देवीच्या या नऊ दिवसांच्या उत्सवात भाविक तिची विधीपूर्वक पूजा करतात. देवीचा हा उत्सव देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.नवरात्रीच्या काळात लोक गरबा-दांडिया खेळतात आणि देवीचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात जातात.
देवीचा हा उत्सव सर्वत्र वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. नवरात्रोत्सवात काही खास प्रथा आणि परंपरा पाहायला मिळतात. एक अशी जागा आहे जिथे पुरुष साडी नेसून नवरात्र साजरे करतात.
अहमदाबाद, गुजरातमधील बरौत समाजाचे पुरुष नवरात्रीच्या वेळी साडी नेसतात आणि गरबा खेळतात. या सोहळ्यात पुरुष मोठ्या संख्येने सहभागी होतात. गुजरातमधील वडोदरा येथील अंबा माता मंदिरात साडी नेसलेले पुरुष गरबा खेळायला येतात.
पुरुष गरबा खेळत असताना, त्याचवेळी काही स्त्रिया बसून गाणी गातात. हे दृश्य पाहण्यासाठी लोक दूरदूरवरून मंदिरात येतात.अंबाजी माता मंदिर हे प्राचीन आणि प्रमुख धार्मिक स्थळांमध्ये ओळखले जाते. दुर्गा देवीच्या 51 शक्तीपीठांमध्ये हे मंदिर समाविष्ट आहे.
शेरी गरबा परंपरा
अहमदाबाद, गुजरातमध्ये सुरू असलेल्या या परंपरेला शेरी गरबा म्हणतात.नवरात्रीच्याअष्टमी तिथीच्या रात्री बारौत समाजाचे लोक साडी नेसून गरबा करतात. येथे पुरुष 200 वर्ष जुनी परंपरा पाळत आहेत.येथे राहणारे लोक मानतात की सुमारे 200 वर्षांपूर्वी सदुबा नावाच्या महिलेने बरौत समाजातील पुरुषांना शाप दिला होता, म्हणून ही परंपरा नवरात्रीमध्ये देवी मातेला प्रसन्न करण्यासाठी पाळली जाते आणि त्याबद्दल पुरुषांनी माफी देखील मागितली.
यासोबतच असंही मानलं जातं की, प्राचीन काळी लोक गरोदरपणात महिलांसाठी रात्री उशिरा गरबा खेळणं सुरक्षित मानत नसत. मग पुरुषांनी महिलांच्या वेशात गरबा खेळायला सुरुवात केली.