नवरात्री सणात देवीची आराधना केली जाते. या दरम्यान व्रत-उपास आणि पूजा-आराधना याचे विशेष महत्त्व आहे. ज्याप्रकारे नवरात्रीचे नऊ दिवस, दुर्गा देवीच्या विविध रुपांची पूजा केली जाते त्याच प्रकारे या 9 दिवसात देवीला प्रत्येक दिवशी 9 विशेष भोग किंवा प्रसाद अर्पित केल्याने देवी आई सर्व प्रकाराच्या समस्यांपासून मुक्ती देते.
जाणून घ्या दिवसानुसार देवीला नैवेद्य अर्पण केल्याने कोणते फायदे होतात आणि कोणत्या समस्या दूर होतात. देवीला प्रसन्न करण्यासाठी कोणत्या दिवशी कोणता प्रसाद द्यावा -
1 नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे देवी शैलपुत्रीचा दिवस. या दिवशी देवीच्या चरणी गाईचे शुद्ध तूप अर्पण केल्याने आरोग्य लाभते व सर्व रोग दूर होऊन शरीर निरोगी राहते.
2 नवरात्रीचा दुसरा दिवस देवी ब्रह्मचारिणीचा आहे. या दिवशी देवीला साखर अर्पण करून प्रसन्न केले जाते. हे देवीच्या चरणी अर्पण करून कुटुंबातील सदस्यांमध्ये वाटल्यास प्रत्येकाचे आयुर्मान वाढते.
3 चंद्रघंटा हे नवदुर्गेचे रूप आहे. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी मातेच्या या रूपाची पूजा केली जाते. या दिवशी देवीला दूध किंवा खीर किंवा दुधापासून बनवलेले गोड पदार्थ ब्राह्मणांना अर्पण करणे शुभ आहे. यामुळे दुःखापासून मुक्ती आणि परम सुख मिळते.
4 नवरात्रीच्या चौथ्या दिवशी मालपुआ अर्पण केल्याने दुर्गा देवी प्रसन्न होते. हा नैवेद्य मंदिरातील ब्राह्मणाला दान करावा. असे केल्याने बुद्धिमत्तेचा विकास होतो तसेच निर्णय क्षमता वाढते.
5 नवरात्रीचा पाचवा दिवस म्हणजे माता स्कंदमातेचा दिवस. या दिवशी देवीला केळी अर्पण करणे खूप चांगले आहे. असे केल्याने तुम्हाला चांगले आरोग्य आणि निरोगी शरीर मिळते.
6 नवरात्रीच्या सहाव्या दिवशी मातेला मध अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी मध अर्पण केल्याने व्यक्तीची आकर्षण शक्ती वाढते.
7 नवरात्रीच्या सातव्या दिवशी मातेला गुळाचा नैवेद्य दाखवावा. सातव्या नवरात्रीला मातेला गूळ अर्पण करून ब्राह्मणाला दान केल्याने दुःखापासून मुक्ती मिळते आणि अनपेक्षित संकटांपासूनही रक्षण होते.
8 नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवीला नारळ अर्पण करा आणि नारळही दान करा. यामुळे मुलांशी संबंधित सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते आणि देवी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो.
9 नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच नवमी तिथीला तीळ अर्पण करून ब्राह्मणाला दान करावे. यामुळे मृत्यूच्या भीतीपासून मुक्तता मिळते आणि अनुचित घटनांनाही आळा बसतो.