नवरात्री दरम्यान दुर्गादेवीची पूजा आणि आरती करणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की नवरात्रीमध्ये दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात. नवरात्रीत देवीच्या आराधनेसोबतच मंत्र, चालिसा, स्तुती पठण करावे. यासोबतच नियमानुसार आरती करावी पण तुम्हाला माहित आहे का की दुर्गेची आरती कशी करावी-
शास्त्रात देवतांची पूजा केल्यानंतर आरती करणे आवश्यक असल्याचे मानले गेले आहे. आरती केल्यावरच पूजा पूर्ण होते असे मानले जाते. जर तुम्ही दुर्गा देवीची करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. नियामाने आरती केल्याने आईच्या कृपेने आपल्या सर्व सुख लाभतील.
आरतीमध्ये या गोष्टी अवश्य असाव्यात
सुख आणि सौभाग्यासाठी देवीच्या आरतीसाठी ताटात तुपाचा दिवा लावावा. यासोबत लवंग आणि कापूर नक्की टाकावे.
असे मानले जाते की लवंग आणि कापूर वापरल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घर आनंदाने भरते.
लाल रंगाची दिव्याची वात ठेवावी
वातीबद्दल सांगायचे तर ती लाल रंगाची असावी. यासाठी तुम्ही कलवा किंवा मोली वापरू शकता. जर असे करणे शक्य होत नसेल तर दिव्यात थोडे कुंकु टाकावे. लाल रंग मंगळाशी संबंधित आहे आणि या प्रकारे वात प्रज्वलित केल्याने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते तसेच सर्व प्रकारचे रोग, दोष आणि भीती दूर होते.
शुद्ध तूप वापरा
आरतीसाठी दिवा लावाताना गायीचे शुद्ध तूप वापरावे. कारण तुपाचा संबंध सूर्य आणि गुरूशी आहे. अशात समाजात मान-सन्मानासह सुख, समृद्धी आणि आनंद प्राप्ती होते.
लवंग आणि कापूर
तुपासह लवंग पेटवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि सकारात्मक ऊर्जा येते. अशा प्रकारे आरती केल्याने देवीची असीम कृपा प्राप्त होते. त्याचप्रमाणे कापूर लावल्याने याच्या धुराचाही घरातील प्रत्येक सदस्याच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडतो.