उपवासासाठी स्पेशल पनीर पकोडा रेसिपी जाणून घ्या साहित्य आणि कृती
साहित्य -
1 वाटी कुट्टूच पीठ,लाल तिखट, जिरेपूड, उपवासाचे मीठ, हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, शेंगदाणा तेल, किंवा साजूक तूप, पनीर,
कृती-
कुट्टूच्या पिठाचे पकोडे बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात कुट्टूच पीठ काढून त्यात मीठ, जिरेपूड, हिरव्यामिरच्या ,लाल तिखट कोथिंबीर घालून पाणी घालून घोळ तयार करा.लक्षात ठेवा की घोळ घट्टसर ठेवायचे आहे जेणे करून घोळ पनीरवर चांगल्याप्रकारे चिकटले पाहिजे. पनीर पातळ किंवा गोलाकार कापून पनीर घोळात बुडवून कढईत तेल घालून गरम तेलात सोडा आणि तांबूस रंग येई पर्यंत तळून घ्या.गरम कुट्टूच्या पीठ आणि पनीरचे पकोडे हिरव्या चटणीसह सर्व्ह करा.