Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अँपलचा सर्वात स्वस्त फोन आयफोन 6c

अँपलचा सर्वात स्वस्त फोन आयफोन 6c
, बुधवार, 19 ऑगस्ट 2015 (11:42 IST)
ट्विटरवर अनेक वेळा सर्वात मोठे खुलासा करणार्‍या इव्हान ब्लास यांच्या ट्विटरवर आपण भरवसा ठेवला. तर पुढील महिन्यात अँपल स्वस्त आयफोनची सिरीज बाजारात उतरवत आहेत. अमेरिकन कंपनी अँपलने आपला जनरेशन नेक्स्ट अँपल टीव्ही, आयफोन 6 चे नवीन व्हर्जन तसेच आयपॅड लॉन्च करणार आहे. पुढील महिन्यात सप्टेंबरमध्ये एका शानदार सोहळ्यात हे लॉन्चिंग होणार आहे. 
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 9 सप्टेंबरला होणार्‍या या शानदार समारंभात अँपल आपला सर्वात स्वस्त फोन लॉन्च करणार आहे. इव्हान ब्लास यांनी केलेल्या ट्विटनुसार आयफोन 5c च्या यशानंतर कंपनी आयफोन 6c लॉन्च करणार आहे. तो आयफोन 5c पेक्षा स्वस्त असणार आहे. प्रिमियम मेटल बॉडीचा हा फोन पुढील महिन्यात लॉन्च करणार आहे. 
 
यापूर्वी ट्विटरवरून इव्हान ब्लास यांनी ट्विट केले होते की, आयफोन 6s, 6s प्लस आणि 6c एकत्र लॉन्च करणार असल्याचे ट्विट केले होते. त्यानंतर अँपलने तसेच केले होते. त्यामुळे आता या ट्विटरवरही विश्वास ठेवला जाऊ शकतो असे म्हटले जात आहे. याचा डिस्प्ले 4 इंचाचा असेल असे म्हटले आहे. आता ही अफवा आहे की सत्य हे पाहण्यासाठी आपल्याला 9 सप्टेंबरची वाट पाहावी लागणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi