Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अँपवर ‘भूत’ घालतंय धुमाकूळ

अँपवर ‘भूत’ घालतंय धुमाकूळ
, बुधवार, 28 जानेवारी 2015 (16:16 IST)
आज काल स्मार्टफोनची संख्या फार कमी नाही आणि त्यावर असलेल्या अँप्लिकेशनही काही कमी नाहीत. यात काही गेमचे अँप्लिकेशन (अँप्स) आहेत तर काही सामाजिक बांधिलकी जपणारी तर काही मनोरंजनात्मक.. पण सध्या तरुणांच्या मोबाइलवर एक वेगळंच अँप्लिकेशन धुमाकूळ घालतंय..
 
मोबाइलमधलं हे नवीन अँप्लिकेशन पाहिलं तर आपल्याला असं वाटत असेल की त्यावर केवळ गेम सुरु आहे.. पण नाही.. कारण, या अँप्लिकेशनवर सुरु आहे ‘भूत’ शोधण्याचा कार्यक्रम.. 
 
भूत.. हा शब्द ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल.. पण हे खरंय.. सध्या अनेक तरुण मोबाइलवर हे अँप्लिकेशन धुमाकूळ घालतंय. सध्या गमतीनं म्हणून जरी ही तरुण मुलं हे अँप्लिकेशन हाताळत असले तरी हा चिंतेचा विषय बनू शकतो.. हे अँप्लिकेशन हजारो तरुणांच्या मोबाइलमध्ये असल्यानं यातून अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जाऊ लागलंय. 
 
त्यामुळेच अंनिसच्या कार्यकर्त्यांनी हे अँप बंद करावं, अशी मागणी केलीय. 
 
भूतासंदर्भात जागोजागी चर्चा होतात.. त्यावर अनेक चित्रपटही तयार होतात.. मात्र, भूत ही संकल्पनाच अस्तित्वात नसून तो मनुष्याच मनाचा खेळ आहे. त्यामुळे असे अँप्स वापरून नये, असा सल्ला मानसशास्त्रज्ञ प्रो. एस. शिंदे देतात. देव आहे की नाही.. भूत आहे की नाही.. यावर वर्षानुवर्षे चर्चा होतात.. त्यावर वादही होतात. मात्र, मोबाइलमधलं असं अँप्लिकेशन सामाजिक आरोग्य धोक्यात टाकणारंच आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi