Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आयफोन 6एस च्या किंमतीत 16 टक्क्यांनी कपात

आयफोन 6एस च्या किंमतीत 16 टक्क्यांनी कपात
, बुधवार, 23 डिसेंबर 2015 (12:41 IST)
आयफोन 5एस च्या नंतर आता अँपल कंपनीने पुन्हा एकदा मोबाइल प्रेमींसाठी नवे आयफोन सादर केले आहेत. दोन महिन्यांपूर्वी लॉन्च करण्यात आलेल्या आयफोन 6एस आणि आयफोन 6एस प्लस च्या मागणीत घट झाल्यामुळे त्यांच्या किंमतीत 16 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. भारतात 16 ऑक्टोबरला लॉन्च झालेल्या आयफोन 6एस ची किंमत 62 हजार इतकी होती पण आता त्याची किंमत 50 हजारापर्यंत करण्यात आली आहे. तर आयफोन 6एस प्लसची किंमत 92 हजार इतकी होती त्यात 10 हजार रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. तसेच 
 
आयफोनच्या 64 जीबी आणि 128 जीबी या इतर मोबाइल्सची किंमतही कमी करण्यात आली आहे. 
 
6एसच्या चाहत्यांसाठी ही मोलाची संधी चालून आली आहे. या दोन्ही मोबाइल्समध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. 
 
यात 3डी टच असल्याने आयफोनचा डिस्प्ले हलका स्पर्श, जोराने केलेला स्पर्श आणि डीपर प्रेस असे तीन प्रकारचे टच जाणू शकतो. हे आयफोन्स् 16जीबी, 32 जीबी, आणि 64जीबी या तीनही वेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आले आहेत. तसेच तो फोन वाकू नये म्हणून 7000 सीरीज या अँल्युमिनियमचा वापर करण्यात आला आहे.
 
तसेच Get Direction किंवा Take Selfie असे फीचर्स आहेत ज्याने अँपल अँक्सेस न करता वापरला जाऊ शकतो. 
 
आयफोन 6एस यात 12 मेगापिक्सल कॅमेरा 5 मेगापिक्सल सेल्फी कॅम 4.7 इंच डिस्प्ले आयओएस9 ऑपरेटिंग सिस्टम सिल्व्हर, गोल्ड, ग्रे आणि रोज गोल्ड या रंगात उपलब्ध आहे.
 
आयफोन 6एस प्लस यात 12 मेगापिक्सल कॅमेरा, 5 मेगापिक्सल सेल्फी कॅम 5.5 इंच डिस्प्ले आयओएस 9 ऑपरेटिंग सिस्टम सिल्व्हर, गोल्ड, ग्रे आणि रोज गोल्ड या रंगात उपलब्ध आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi