Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आय फोन ७ भारतात विक्री सुरुवात

आय फोन ७ भारतात  विक्री सुरुवात
, शनिवार, 8 ऑक्टोबर 2016 (08:50 IST)
आपल्या भारतात ऍपल आयफोनची प्रतिक्षा आता संपली आहे. त्याचे कारण आहे की आता  7 सप्टेंबरला सॅन फ्रॅन्सिस्को इथे लाँच झालेल्या आयफोन 7 आणि आयफोन प्लस 7 भारतात दाखल झाले आहे. तर विक्रीस ही उपलब्ध झाला आहे.
 
 या फोनची किंमत 60 हजार ते 92 हजार इतकी असणार आहे म्हणजेच जवळपास ७० हजार आहे .तर आपल्या कडे हा फोन म्हणजेच  आयफोन 7च्या 32 जीबी हँडसेटची किंमत 60 हजार रुपये, 128 जीबी हँडसेटची किंमत 70 हजार रुपये तर 128जीबी हँडसेटची किंमत 82 हजार रुपये असणार आहे. तर सर्वाधिक जागा असलेला 256 जीबी हँडसेटची किंमत आहे 92 हजार रुपये.
 
या फोनची खासियत अशी आहे की, त्याला स्लिम बनवण्यासाठी त्यातला ऑडिओ जॅक काढून टाकण्यात आलाय. याशिवाय हा आयफोन लाइटनिंग कनेक्टरवर काम करेल. त्यात वायरलेस हेडफोनही वापरता येंणार आहे.
  29 सप्टेंबरपासून या दोन्ही आयफोन्सची ऑर्डर घेणं सुरू झाल आहे.
 
-  ब्लॅक, जेट ब्लॅक, सिल्वर, गोल्ड आणि रोज गोल्ड
- स्टोअरेज – 32 जीबी,128 जीबी, 256 जीबी
- स्क्रीन – 4.7 इंच (आयफोन 7 प्लस 5.5 इंच)
- वॉटर आणि डस्ट रेसिस्टंट
- होम बटणमध्ये टच सेंसिटिव्हिटीचा आधार
- स्मार्ट कॅमेरा
-  लेन्स, फोटोमध्ये व्यक्ती आणि वस्तूमधला फरक कळतो
- 7 प्लसमध्ये 2 कॅमेरे. एक नॉर्मल, दुसरा टेलिफोटो कॅमेरा 
- हेडफोन जॅक नाही 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रसिद्ध परफ्युम डिझायनर मोनिका घुर्डेचा बलात्कार करून खून