Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एचटीसी वन एम९ आयफोन-६ला टक्कर देणार

एचटीसी वन एम९ आयफोन-६ला टक्कर देणार
, मंगळवार, 18 नोव्हेंबर 2014 (15:49 IST)
जागतिक बाजारपेठेत चांगले आणि दज्रेदार स्मार्टफोन तसेच टॅबलेट्सची निर्मिती करणार्‍या एचटीसी कंपनीने आणखी एक स्मार्टफोन बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. एचटीसीच्या वन सीरिजमधील हा स्मार्टफोन असणार असून त्याचे नाव एम९ असे असेल, असे कंपनीने जाहीर केले आहे. एचटीसीने हा स्मार्टफोन केव्हा बाजारात आणणार, याबाबत काही स्पष्ट केले नसले तरी येत्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एकाच वेळी तो आणला जाणार आहे.
 
एचटीसीने अँपलच्या आयफोनशी स्पर्धा करण्यासाठी त्याच तोडीचे दज्रेदार स्मार्टफोन बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. अँपलच्या आयफोन ६ला आव्हान देण्यासाठी एचटीसी वन एम९ मध्ये देखील त्याच प्रकारचे फीचर्स समाविष्ट केले आहेत. या स्मार्टफोनची जाडी केवळ ७.१ एमएम असून त्याला मेटल बॉडीचे आवरण आहे. ५.२ इंच डिस्प्ले, २के क्वालिटीचे रिझोल्युशन व क्यूएचडी डिस्प्ले असणार आहे. कार्यक्षमता अधिक सक्षम व्हावी यासाठी स्मार्टफोनला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८0५ एसओसी प्रोसेसर व ३ जीबी रॅम दिले गेले आहे. त्याचबरोबर यामध्ये लेटेस्ट अँड्रॉईड ५.0 लॉलीपॉप प्लॅटफॉर्म असणार आहे. विशेष स्मार्टफोनची मेमरी ६४ जीबी आणि १२४ जीबी इतकी असणार आहे. तसेच वन सीरिजमधील सर्वात दज्रेदार कॅमेरा यामध्ये असणार आहे. एवढेच नव्हे तर याची बॅटरीदेखील शक्तिशाली दिली जाणार आहे, जेणेकरून कितीही वेळ वापरला तरी स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपणार नाही. एचटीसी वन एम९ची किंमत अद्यापि कंपनीने जाहीर केली नसली तरी आयफोन ६च्या तुलनेत थोडीफार कमी असेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi