Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअपसाठी ‘मोबाइल अँप’

गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअपसाठी ‘मोबाइल अँप’
, शुक्रवार, 26 जून 2015 (11:47 IST)
आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या डेटिंग अँपबद्दल ऐकलं असेल पण, आता तुम्हाला ब्रेकअप करतानाही मदत करेल असं एक भयंकर अँप तयार करण्यात आलंय. या अँपची खासियत म्हणजे, केवळ 37 सेकंदात हे अँप तुम्हाला तुमच्या डोक्याचा ताप वाढवणार्‍या तुमच्या गर्लफ्रेंडपासून सुटका करण्यास मदत करेल.
 
‘बिंडर’ नावाच्या या अँपनं केलेल्या दाव्यानुसार, तुम्हाला गर्लफ्रेंडशी ब्रेकअप करायचंय पण, हे बोलून दाखवण्याची हिंमत होत नसेल तर मग हे काम ‘बिंडर’वर सोडून द्या. हे अँप पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या गर्लफ्रेंडबद्दल काही माहिती मागेल. नाव, फोटो आणि नंबर वगैरे माहिती भरल्यानंतर हे अँप 37 सेकंदांचा एक ऑडिओ आणि टेक्स्ट मॅसेज स्वत:च तयार करेल आणि तुमच्या गर्लफ्रेंडला ‘सेंड’देखील करेल.. आणि मग ‘झालं काम तमाम’. त्यामुळे, तुम्हाला ना कोणत्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल ना तिखट गोष्टी ऐकाव्या लागणार. 
 
तुम्ही जशी प्रोसेस पूर्ण कराल तसं हे अँप एक खतरनाक किंवा कूल मॅसेज तयार करून तुमच्या गर्लफ्रेंडला पाठवतं. आणि मग साहजिकच नातं संपुष्टात येईल, असा दावा या अँपच्या निर्मात्यांचा दावा आहे. या अँपमध्ये सद्या दोन उणीवा आहेत. पहिली म्हणजे, हे अँप सध्या तरी ब्रिटनच्या यूजर्ससाठीच उपलब्ध आहे आणि दुसरं म्हणजे हे अँप सध्या तरी केवळ पुरुषांनाच उपयोगी पडू शकतं. पण, लवकरच महिलांसाठीही हे अँप बनवण्यात येणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi