Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चीनबाहेरही शाओमी वेगात

चीनबाहेरही शाओमी वेगात
, मंगळवार, 2 जून 2015 (16:50 IST)
चिनी मोबाइल कंपनी शाओमीने चीनसह इतर देशातही आपलं वर्चस्व निर्माण करायला वेगाने सुरुवात केली आहे. त्यामुळे सॅमसंगला जोरदार टक्कर देत असल्याचं चित्र मोबाइल बाजारात आहे.
 
अमेरिका आणि युरोपमधील बाजारात शाओमीने 5000 mh आणि 10400 mh बॅटरी पॉवर बँक, मी बँण्ड, इअर फोन्स आणि मोबाइल फोन उपलब्ध आहेत. आपल्या कंपनीला यूएस आणि युके सारख्या देशामध्ये बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी चीन फारच प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.
 
आपल्या कंपनीच्या ब्रँण्डिंगसाठी वेगवेगळ्या पद्धतीने शाओमी प्रमोशन करीत आहे. यासाठी सोशल नेटवर्किगचा ते योग्यरीत्या वापर करीत आहेत. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी या देशात पुरवठा साखळी तयार करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.
 
अमेझॉन या शॉपिंग वेबसाइटवरुन शाओमीचा सर्वाधिक प्रचार होत असून याद्वारे इतर देशांमध्ये स्मार्टफोन आणि इतर वस्तूंची विक्री होत आहे.
 
भारतामध्ये या स्मार्टफोनची विक्री फ्लिपकार्ट आणि अमेझॉन या दोन शॉपिंग वेबसाइटवरुन सुरु आहे.
 
शाओमी कंपनीची सुरुवात ही एप्रिल 2010 मध्ये झाली होती. त्यांनी आपला पहिला स्मार्टफोन हा ऑगस्ट 2011 साली लॉन्च केला होता. भारतातही या स्मार्टफोनची क्रेझ असल्याचे दिसून येत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi