Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन भारतात होणार लॉन्च

जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन भारतात होणार लॉन्च
, बुधवार, 17 फेब्रुवारी 2016 (15:37 IST)
भारतीय स्मार्टफोन उत्पादक कंपनी रिंगिंग बेल्स या आठवडय़ात सर्वात स्वस्त स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या स्मार्टफोनची किंमत साधारण 500 रुपये इतकी आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्यीकर 17 फेब्रुवारीला या स्वस्त स्मार्टफोन फ्रीडम 251चे लॉन्चिंग करणार आहेत. जगातील सर्वात स्वस्त असा हा स्मार्टफोन आहे. भारतात स्मार्टफोन मार्केटमध्ये दिवसेंदिवस वाढ होतेय. स्मार्टफोन मार्केटमधील इतर स्मार्टफोन्सना टक्कर देण्यास फ्रीडम 251 स्मार्टफोन सज्ज झालाय. सध्या तरी या स्मार्टफोनमध्ये कोणते फीचर्स आहेत याची माहिती मिळू शकलेली नाही. 
 
याआधीही रिंगिंग बेल्सने 2,999 रुपये किमतीचा 4 जी स्मार्टफोन लॉन्च केला होता. 
 
यात कंपनीने पाच इंचाचा डिस्प्ले, 1.3 गिगाहर्टझ क्वाडकोर प्रोसेसर, 1 जीबी रॅम आणि 8 जीबी इंटरनल मेमरी असे फीचर्स दिले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi