Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

टॅटूने अनलॉक होणार मोटो एक्स

टॅटूने अनलॉक होणार मोटो एक्स
, सोमवार, 28 जुलै 2014 (13:23 IST)
स्मार्टफोनचा वापर जसा वाढत चालला आहे तशी युजरचा फोन अन्य कुणाला सहजी उघडता येऊ नये यासाठी वेगवेगळी तंत्रेही विकसित केली जात आहेत. स्मार्टफोन अनलॉक करण्यासाठी फिंगरपिंट्र, डोळ्याची बुबुळे, आवाज अशा मानवी अवयवांचा वापरही केला जात आहे. पासवर्ड न देताही फोन अनलॉक करता यावा यासाठी मोटोरोलाने नवीन युक्ती वापरली आहे. यात हातावरच्या टॅटूच्या सहाय्याने मोटोरोलाचा फोटो एक्स हा स्मार्टफोन अनलॉक करता येणार आहे. यासाठी कंपनीने डिजिटल टॅटूची सोय केली आहे. या टॅटूच्या मदतीने फोन अनलॉक करण्याची पद्धत अतिशय सोपी आणि मनोरंजक आहे. शरीरावर जेथे हा टॅटू असेल त्यावर फोटो एक्सचा मागचा भाग टेकवायचा आणि काही सेकंदात फोन अनलॉक झालेला पाहायचा. ज्यांना आपल्या स्मार्टफोनमधील गुप्त माहिती दुसर्‍यांबरोबर शेअर करायची नाही त्यांच्यासाठी अनलॉकचा हा प्रकार फारच उपयुक्त ठरेल असा कंपनीचा दावा आहे. या पद्धतीमुळे दुसरा कुणीही युजरचा फोन अनलॉक करू शकत नाही. 

Share this Story:

Follow Webdunia marathi