Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ट्विटरमुळेही नातेसंबंध तुटण्याची भीती?

ट्विटरमुळेही नातेसंबंध तुटण्याची भीती?
, गुरूवार, 1 मे 2014 (13:07 IST)
फेसबुक हे नातेसंबंधांवर हानिकारक प्रभाव टाकत असल्याचा दावा संशोधकांनी यापूर्वीच केला आहे. त्यानंतर आता संशोधकांनी ट्विटरमुळे नातेसंबंध तुटून घटस्फोट होऊ शकतो याकडे लक्ष वेधले आहे. विशेष म्हणजे फेसबुक आणि ट्विटरच्या दुष्परिणामांचा अभ्यास एकाच व्यक्तीने केला आहे. ट्विटरमुळे   भावनिक आणि शारीरिक फसवणूक होऊ शकते, असं संशोधकांचं मत आहे. मिसौरी विद्यापीठातील रसेल क्लेटन यांनी सोशल मीडिया हानिकारक परिणाम घडवतो का, याबाबत अभ्यास केला. क्लेटन यांनी नुकत्याच केलेल्या एका संशोधनात सर्व वयोगटातील 581 ट्विटर युजर्सना, त्यांच्या सोशल नेटवर्कवरील सहभागाविषयी विविध प्रश्न विचारले.
 
ट्विटरच्या वापरामुळे त्यांचा आपल्या जोडीदाराशी संघर्ष उद्भवतो का? अशी विचारणा करण्यात आली. त्यावेळी क्लेटन यांना असं आढळून आलं की, एखादी व्यक्ती ट्विटरवर जेवढी सक्रिय असते, तिचा आपल्या जोडीदाराशी, ट्विटरशी संबंधित संघर्ष उद्भवण्याची शक्यता अधिक असते. यामुळे नातेसंबंधांवर नकारात्मक परिणाम होतो आणि फसवणूक ते घटस्फोट होण्याची शक्यता वाढते. पण जे युजर्स सोशल नेटवर्कचा वापर अधिक करतात, त्यावरुन वाद होण्याची शक्यता अधिक असते, यात आश्चर्य वाटण्याजोगे काहीच नाही. कारण एखाद्या व्यक्तीचा छंद, त्याचा अधिक वेळ घेत असेल तर त्याचे आपल्या जवळच्या व्यक्तीशी वाद होण्याची शक्यता अधिक असते. अर्थात नातेसंबंधांमध्ये अप्रामाणिकपणा आणि विभक्त होणं, यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात. पण ट्विटर आणि फेसबुक यासारख्या सोशल नेटवर्किग साईट या नातेसंबंधांना हानिकारक ठरु शकतात, असं क्लेटन यांनी अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi