Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दमदार बॅटरीसह आसूसचा ‘झेनफोन मॅक्स’ लॉन्च

दमदार बॅटरीसह आसूसचा ‘झेनफोन मॅक्स’ लॉन्च
, बुधवार, 6 जानेवारी 2016 (11:39 IST)
तैवानची टेक्नॉलॉजी कंपनी आसूसनं सोमवारी भारतात आपला फोर जी सपोर्टिव्ह ‘एनेबल्ड झेनफोन मॅक्स’ (झेनफोन मॅक्स) हा स्मार्टफोन लॉन्च केलाय. 
 
यामध्ये 5000 एमएएच बॅटरीचा वापर करण्यात आलाय. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार या स्मार्टफोनची प्रीबुकिंग ई-कॉमर्स वेबसाईट अमेझॉन डॉट इन आणि फ्लिपकार्ट डॉट कॉमवर सोमवारी दुपारपासून सुरू झालीय. उल्लेखनीय म्हणजे या स्मार्टफोनची लीथियम-पॉलीमर बॅटरी 37.6 तास थ्रीजी टॉक टाईम, 32.5 तास वाय-फाय वेब ब्राऊजिंग आणि 72.9 तास प्ले बॅक म्युझिक किंवा 22.6 तास व्हिडिओ प्लेबॅकसाठी सक्षम आहे. ‘झेनफोन मॅक्स’चे फीचर्स.. रिअर कॅमेरा - 13 मेगापिक्सल, फ्रंट कॅमेरा - 5 मेगापिक्सल प्रोसेसर - क्वॉलकॉम 8916 (स्नॅपड्रॅगन 410) क्वॉड कोअर. 
 
रॅम - 2 जीबी इंटरनल मेमरी - 16 जीबी (एसडी कार्डच्या साहाय्यानं 64 जीबीपर्यंत वाढवता येते)
 
चेसिस - 5.2 मिलिमीटर.
 
जानेवारीच्या तिसर्‍या आठवडय़ापासून हा स्मार्टफोन स्टोअर्समध्येही मिळू शकेल. 
 
भारतात या स्मार्टफोनची किंमत आहे 9999 रुपये.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi