Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दोन सेकंदात ‘आउट ऑफ’ स्टॉक झालेल्या स्मार्टफोनची पुन्हा विक्री

दोन सेकंदात ‘आउट ऑफ’ स्टॉक झालेल्या स्मार्टफोनची पुन्हा विक्री
, सोमवार, 15 फेब्रुवारी 2016 (11:29 IST)
चीनची स्मार्टफोन उत्पादक कंपनी लेईकोचा लेटेस्ट स्मार्टफोन लेई 1 या स्मार्टफोनला तुफान प्रतिसाद मिळाला. अवघ्या दोन सेकंदात 70 हजारारहून अधिक स्मार्टफोनची विक्री झाली. ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेता कंपनी 9 फेब्रुवारीला या स्मार्टफोनची पुन्हा विक्री करणार आहे. यासोबतच यावेळी कॅश बॅक ऑफरही देण्यात येणार आहे. याआधी लेई1 चे स्मार्टफोन अँक्सिस बँकेच्या क्रेडिट अथवा डेबिट कार्डाद्वारे खरेदी केल्यास 10 टक्क्यांची कॅशबॅक ऑफर देण्यात आली होती. केवळ 10 हजार 999 रुपयांत उपलब्ध असणार्‍या या स्मार्टफोनमध्ये कंपनीने जबरदस्त फीचर्स दिलेत. याची किफायतशीर किंमत आणि जबरदस्त फीचर्समुळे या फोनला लोकांनी मोठी पसंती दर्शवली होती. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi