Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ब्लॅकबेरीचा तब्बल 1 लाखाचा स्मार्टफोन

ब्लॅकबेरीचा तब्बल 1 लाखाचा स्मार्टफोन
, सोमवार, 24 ऑगस्ट 2015 (11:35 IST)
स्मार्टफोन मेकर कंपनी ब्लॅकबेरीने आपला प्रीमियम P’9983 ग्रेफाइट स्मार्टफोन काही दिवसापूर्वीच भारतात लाँच करण्यात आला. या स्मार्टफोनची किंमत तब्बल रु. 99,990 आहे. हा भारतीय बाजारपेठेतील सर्वात महाग स्मार्टफोन आहे. पोर्शे डिझाइन पी9983 ग्रेफाइटच्या आधी पोर्शने ब्लॅकबेरीचे तीन आणि स्मार्टफोन डिझायन केले आहे. हा या सीरिजचा चौथा स्मार्टफोन आहे.

ब्लॅकबेरी P’9983 ग्रेफाइट स्मार्टफोनचे फीचर्स:3.1 इंच स्क्रिन, 720*720 पिक्सल रेझ्युलेशन 1.5 GHz डय़ुलकोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन S4 प्रोसेसर. 2 जीबी रॅम, ब्लॅकबेरी 10 ऑपरेटिंग सिस्टम 16 जीबी इंटरनल मेमरी, 128 जीबी पर्यंत वाढविता येईल. 
 
8 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा 3जी वाय-फाय, ब्ल्यूटूथ, 2100 mh बॅटरी क्षमता.

Share this Story:

Follow Webdunia marathi