Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ब्लॅकबेरी मेसेंजरवर पाकमध्ये डिसेंबरपासून बंदी

ब्लॅकबेरी मेसेंजरवर पाकमध्ये डिसेंबरपासून बंदी
, शुक्रवार, 31 जुलै 2015 (11:29 IST)
पाकिस्तान सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव ब्लॅकबेरी लिमिटेडच्या मेसेजिंग सेवेवर 1 डिसेंबरपासून बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून त्या संदर्भातल्या सूचना व आदेश पाकिस्तान टेलिकम्युनिकेशन अँथॉरिटीने स्थानिक मोबाइल ऑपरेटर्सना दिले असल्याचेही समजते.
 
पाकिस्तान अण्वस्त्रधारी देश आहे त्याचबरोबर सध्या तेथे अनेक धोकादायक दहशतवादी संघटना, गुन्हेगारी टोळ्या आणि अमली पदार्थ स्मगलर्स कार्यरत आहेत. पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयनेही त्यांची दहशतवादी फोनवरून संभाषण करत असताना ते ट्रॅक करण्याची क्षमता वाढविण्यास सुरुवात केली आहे. मात्र ब्लॅकबेरी मेसेंजरमध्ये ईमेल केली तर ती कोडवर्डमध्ये बदलली जाते. तसेच यूजर फोन आणि सावर्जनिक नेटवर्कमध्येही ब्लॅकबेरी मेसेंजर संदेश कोडमध्ये बदलतात. ही यूजरसाठी मोठीच सोय असली तरी काही अपराधी घटना घडल्या तर पोलीस अथवा गुप्तचरानंही ही कोड भाषा उलगडणे अवघड जाते आणि त्यामुळे गुन्हेगार शोधण्यातही अनंत अडचणी येतात. यामुळे ही सेवाच बंद करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi