Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

यामुळे होतो स्मार्टफोन स्लो चार्ज

यामुळे होतो स्मार्टफोन स्लो चार्ज
कित्येक वेळा आपण फोन स्लो चार्ज होणे, ही फोनचीच समस्या समजतो. अशा वेळी ब्रँडवरच प्रश्नचिन्ह उभे केले जाते. मात्र या समस्येचे कारण तुम्हीच असता. 
 
फोनची बॅटरी खराब झाल्याचे तुम्हाला वाटते. परंतु तुमच्या काही चुकामुळेही असे होऊ शकते. तुम्ही तुमच्या फोनवर Wi-Fi, GPS आणि ब्लुटूथ एकाचवेळी वापरता. या सर्व गोष्टी एकाचवेळी ऑन झाल्यामुळे फोन स्लो चार्ज होतो.  अशावेळी फोनला लवकर चार्ज करण्यासाठी सगळ्या सेटिंग आणि सर्व्हिसेस बंद करा. 
 
स्मार्टफोनला पर्सनल कॉम्प्युटरवर चार्ज करताना त्याची चार्जिग स्पीड खूपच स्लो होते. तसेच तुम्ही वायरलेसने चार्ज करत असाल तर खूपच स्लो चार्ज होते. यामुळे तुम्ही चार्जरनेच चार्ज करण्याचा प्रयत्न करा. 
 
स्मार्टफोनवर खूप सारे अँप्स असतात, जसे की, मेल, फेसबुक, टिटर यामुळे बॅटरी कमी होते. या सगळ्या अँप्सला चार्ज करताना बंद करा. फोनला युनिवर्सल चार्जर आणि लोकल अँडॉप्टरने चार्ज केल्याने स्लो चार्जिग होते. 
 
यामुळे फास्ट चार्जिगसाठी अँडॉप्टरचा वापर करा. जो की, तुमच्या फोनबरोबर आलेला आहे. कधी-कधी फोनमध्ये चुकीच्या बॅटरी येतात. अशावेळी बॅटरीची खात्री करुन ती बदलून घ्या. काहीवेळी बॅटरी जुनी असल्यामुळेही फोन स्लो चार्ज होतो. चार्जिग करताना स्मार्टफोनचा वापर केल्यासही स्लो चार्ज होतो. यामुळे फोनचा यावेळी वापर कमी करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पाकवर कठोर कारवाईचे संकेत