Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

व्हॉट्स अँपमध्ये आणखी तीन नवे फीचर लॉन्च

व्हॉट्स अँपमध्ये आणखी तीन नवे फीचर लॉन्च
, मंगळवार, 28 जुलै 2015 (10:46 IST)
इन्स्टंट मोबाइल अँप व्हॉट्स अँपने नव्या अपडेटमध्ये ‘मार्क अँज अनरीड’ फीचर लॉन्च केलं आहे. याद्वारे यूजर्स कोणत्याही चॅटमधील वाचलेले मेसेज ‘न वाचलेला’ अर्थात ‘अनरीड’ मार्क करू शकतात. हे फीचर एखाद्या मेलसाठी असलेल्या ऑप्शनसारखाच आहे. याशिवाय अपडेटमध्ये कस्टम नोटिफिकेशन सेटिंगही देण्यात आली आहे. एखाद्या चॅटमध्ये व्यक्तीच्या नावाखाली यूजर्स कस्टमाईज्ड रिंगटोन, व्हॉल्यूम, व्हायब्रेशन लेंथ, पॉप अप नोटिफिकेशनसारख्या सेटिंग करू शकतात.

नव्या नोटिफिकेशन सेटिंगमध्ये यूजर्स चॅट म्यूटही करू शकतील. ‘मार्क अँज अनरीड’ फीचरमध्ये चॅट फक्त रिसीव्हरकडे अनरीड मार्क दिसेल. मेसेज पाठवणार्‍याकडे कोणताही बदल दिसणार नाही. जेव्हा रिसीव्हर एखादं चॅट वाचल्यानंतर जतन करून ठेवायचं असल्यास हे फीचर काम करेल. यावेळी यूजर चॅटला अनरीड मार्क करून ठेवू शकतो.
 
या अपडेटमध्ये व्हॉट्स अँप व्हॉईस कॉल्ससाठी डेटा यूजेसचा पर्याय दिला आहे, जो कमी कनेक्टिव्हिटीच्या जागांवर फारच उपयोगी पडेल. याशिवाय व्हॉट्स अँप गुगल ड्राइव्ह बॅकअप आणि रीस्टोअर ऑप्शनही पुन्हा घेऊन आलं आहे. हा ऑप्शन काही काळासाठी एपिलमध्ये रिलीज करण्यात आला होता, पण लवकरच तो हटवण्यात आला. पण व व्हॉट्स अँपचं हे व्हर्जन सध्या गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi