Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सर्व रेकॉर्ड मोडले, पाचव्यांदा विक्रीसाठी तयार

सर्व रेकॉर्ड मोडले, पाचव्यांदा विक्रीसाठी तयार
, मंगळवार, 19 ऑगस्ट 2014 (15:43 IST)
जियोमी आपण सर्वात जास्त पसंत करणार्‍या स्मार्ट फोनला घेऊन परत येत आहे. चिनी ऍपल नावाने ओळखणारी कंपनी जियोमीने एमआय 3 नावाचा हा स्मार्ट फोन ऑनलाईन विक्री वेबसाइट फ्लिपकार्टच्या माध्यमाने लाँच केला होता. जियोमीने सोमवारी ट्विटरच्या माध्यमाने ही माहिती दिली की तो आपले 20 हजार युनिट फ्लिपकार्टच्या माध्यमाने मंगळवारी विक्रीसाठी आणणार आहे. पहिल्यांदाच 40 मिनिटात या फोन आऊट ऑफ स्टाक झाला होता.  
 
पुढील पानावर, या फोनची किंमत आणि फीचर्स...
webdunia
कंपनीने म्हटले आहे की 13,999 रुपयात या शानदार फोनची विक्री करणार आहे. या चिनी स्मार्ट फोनला ऍपल आयफोनला टक्कर देण्यासाठी यंदा ग्राहकांना फ्लिपकार्टवर या स्मार्ट फोनच्या खरेदीसाठी अतिरिक्त वेळ देण्यात येईल. मागील विक्रीत स्टॉक संपल्यामुळे कंपनीला बरीच टीका सहन करावी लागली होती. कंपनीचा दावा आहे की मागील आठवड्यातच एमआय 3 चे 20 हजार युनिट 2.4 सेकंदात विक्री झाल्यामुळे फोनच्या चाहत्यांना निराश व्हावे लागले होते.    
 
पुढील पानावर, काय आहे या शानदार फोनचे फीचर्स....

एमआय 3 मध्ये 5 इंचीची फुल एचडी स्क्रीन आहे. हा 441 पिक्सल पर इंच स्पोर्ट करतो. फोनमध्ये लिंड लाइट फ्लॅशसोबतच 13 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा आहे. एचडीआर मोडच्या मदतीने दिवसा काढण्यात आलेले पिक्चर क्वालिटी उत्तम आहे.  
 
webdunia
एंड्रायडचा 4.4.2 किटकॅट ऑपरेटिंग सिस्टम आहे. फोनमध्ये बरेच प्री लोडेड ऍप्लिकेशन देण्यात आले आहे जसे फेसबुक, फ्लिपकार्ट, गूगल प्‍ले स्टोअर. कनेक्‍टीविटीसाठी फोनमध्ये वायफाय, एनएफसी सारखे फीचर देण्यात आले आहे. जियोमी एमआय 3मध्ये मॉय क्‍लाउड स्टोरेजच्या मदतीने तुम्ही तुमच्या फोनमध्ये सेव केलेले फोटो आणि दुसरा डेटा कुठूनही ऍक्सेस करू शकता.  
 
3050 एमएएचची लीथियम ऑयन बॅटरी देण्यात आली आहे जी 2जी मध्ये 21 तासाचा टॉक टाइम आणि 3जीमध्ये 50 तासाचा प्‍लेबॅक टॉइम देते. फोनमध्ये देण्यात आलेले ओएसमध्ये पॉवर ऑपरेटिंग सिस्टम असल्यामुळे यात दुसर्‍या स्मार्टफोनच्या तुलनेत कमी बॅटरी कंज्‍यूम होते. 

Share this Story:

Follow Webdunia marathi