Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सावधान, या नंबरवरून आला फोन तर होईल नुकसान

सावधान, या नंबरवरून आला फोन तर होईल नुकसान
, बुधवार, 7 जानेवारी 2015 (15:59 IST)
तुम्हाला +371 आणि + 375 देशाच्या कोडवरून मिसकॉल आला आणि तुम्ही त्याला कॉलबॅक केला. तर काही सेकंदात तुमच्या मोबाइलमधून 50 ते 200 रुपये कट होऊ शकतात. 
 
जयपूरकर बेलारूसच्या कंट्री कोड +375 आणि लातवियाचा कंट्री कोड + 371 वरून मिसकॉल येत आहेत. या क्रमांकावर कॉल केल्यावर एक रेकॉर्डेड कॉल असल्याचा आवाज येतो. हा आवाज तुम्हाला फटका बसू शकतो. तुम्ही जितके ऐकण्याचा प्रयत्न कराल, तितका तुमचा बॅलेन्स जलद गतीने संपतो. पोस्ट पेड असल्यास महिन्याच्या शेवटी तुम्हाला भले मोठे बिल येऊ शकते. 
 
हा एकप्रकारचा इंटरनॅशनल फ्रॉड आहे. यामुळे अनेक देशांतील मोबाइल युजर्स हैराण आहेत. काही वर्षापूर्वी देशातील इतर शहरातील मोबाइल युजर्सला अशाप्रकारे इंटरनॅशनल कोडच्या नंबरवरून मिसकॉल आले होते. त्यावेळी एका मोबाइल ऑपरेटरने अशा नंबर्सवर कॉल बॅक न करण्याचा सल्ला दिला होता. 
 
हा फ्रॉड करणारी एक इंटरनॅशनल गँग आहे. ते काही प्रीमिअर नंबर खरेदी करून धोका देतात. अशा नंबर्सवर कॉल आल्यास त्याचे काही पैसे त्यांच्या खात्यावर ट्रान्सफ्रर होतात. 
 
देशात अशा प्रकारे चिटींग करण्याची नवी पद्धत आहे. अशा प्रकारे मिसकॉलवर कॉल बॅक केल्यावर वेगवेगळे चार्ज वेगवेगळे ऑपरेट लावतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi