Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सॅमसंगचा रफ ऍड टफ फोन गॅलक्सी Xकव्हर 3

सॅमसंगचा रफ ऍड टफ फोन गॅलक्सी Xकव्हर 3
नवी दिल्ली , शनिवार, 14 मार्च 2015 (12:47 IST)
सॅमसंग मोबाइलने एक अश्या फोनवरून पडदा उचलला आहे, जो फक्त सुंदरच नव्हेतर लुक्समध्ये ही खास आहे. हा एक स्वस्त स्मार्टफोन आहे जो वादळ, तुफान, पाऊस आणि कुठल्याही मोसमाचा सामना करू शकतो. सॅमसंगने या फोनचे नाव गॅलक्सी Xकव्हर 3 ठेवले आहे.   
 
नवीन गॅलक्सी Xकव्हर 3 4.5 इंची स्क्रीन (480x800 पिक्सल रिझोल्यूशन) असणारा रफ ऍड टफ स्मार्टफोन आहे जो ऐंड्रॉयड 4.4 (किटकॅट) वर काम करतो. सॅमसंगचे म्हणणे आहे की या फोनसाठी लवकरच ऐंड्रॉयड लॉलीपॉप अपडेटपण उपलब्ध होईल. या फोनमध्ये   1.2 गीगाहर्त्ज क्वाड-कोर प्रोसेसर आणि 1.5 जीबी रॅम आहे. तसेच 8 जीबी इंटर्नल स्टोरेज आणि हा मायक्रोएसडी कार्डला देखील सपोर्ट करतो.   
 
गॅलक्सी Xकव्हर 3 मध्ये 5 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आहे जे पाण्यात देखील फोटो काढू शकतो. त्याच बरोबर यात 2 मेगापिक्सल रिझोल्यूशनचा प्रायमरी कॅमेरा आहे. या फोनमधये 2200 mAh बॅटेरी आहे.   
  
या फोनच्या टफनेसची गोष्ट केली तर, तो सॅमसंग गॅलक्सी Xकव्हर 3ला IP67 आणि MIL-STD 810G सर्टिफिकेशन मिळाले आहे. अर्थात या फोनवर धूळ मातीचा काहीच असर होत नाही आणि 1 लीटर पाण्यात जर 30 मिनिटापर्यंत बुडून राहिला तरी हा काम करू शकतो. याचा अर्थ या फोनवर धूळ, उमस, पाऊस, ऊन, विजेचे झटके किंवा वायब्रेशनचा काहीच प्रभाव होत नाही.  
 
सॅमसंग गॅलक्सी Xकव्हर 3 स्मार्टफोनला पुढील आठवड्यात CeBIT इंडस्ट्री एक्स्पोमध्ये सादर करणार आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi