Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्पाईसचा फायरफॉक्स ओएस स्मार्टफोन

स्पाईसचा फायरफॉक्स ओएस स्मार्टफोन
, सोमवार, 1 सप्टेंबर 2014 (17:26 IST)
इंटरनेट ब्राऊझर म्हणून प्रसिद्धीस आलेल्या मोझिलाने फायरफॉक्स ही नवी स्मार्टफोन ऑपरेटिंग सिस्टिम लाँच केल्यानंतर त्यावर आधारित पहिला फोन स्पाईस मोबाईल्सने बाजारात आणला आहे. ३.५ इंच स्क्रीन आणि फायरफॉक्स ओएसवर आधारित असलेल्या स्पाईसच्या या स्मार्टफोनचं नाव स्पाईस फायर वन एमआय-एफएक्सआय असे आहे. 
 
बाजारात आधीच असलेल्या नोकियाच्या सिम्बियन, आशा, अँपलच्या आयओएस, गुगलच्या अँड्रॉईड, मायक्रोसॉफ्टच्या विंडोज, ब्लॅकबेरी आणि नोकियाच्या काही इंजिनीयर्सनी लाँच केलेल्या जोला पाठोपाठ मोझिलाची फायरफॉक्स ही ओएस बाजारात उतरली आहे. स्पाईसच्या फायर वन स्मार्टफोनमध्ये १ गिगाहट्र्झ क्षमतेचा प्रोसेसर आणि २ मेगापिक्सेलचा मुख्य म्हणजे रिअर कॅमेरा तर १.३ मेगा पिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. स्पाईस फायर वनच्या विक्रीसाठी स्नॅपडिल या शॉपिंग वेबसाईटवरोबर करार करण्यात आला आहे. यापूर्वीही वेगवेगळ्या ऑनलाइन शॉपिंग वेबसाईटबरोबर एक्स्लुसिव्ह करार करण्याचे फायदे मोबाईल फोन उत्पादकांना मिळाले आहेत. त्याचाच फायदा उठवण्याचा स्माईस फायर वनचा प्रयत्न आहे.

गेल्या वर्षी फायरफॉक्स ही स्मार्टफोन ओएस लाँच केल्यानंतर मोझिलाने इंटेक्स आणि स्पाईस मोबाईलबरोबर मोबाईल फोन निर्मितीसाठी करार केला होता. सध्या फीचर फोन म्हणजेच बेसिक मोबाईल फोन वापरत असलेल्या पण भविष्यात स्मार्टफोन वापरणार्‍यांपर्यंत पोहोचण्याचं उद्दिष्ट स्पाईस आणि इंटेक्सने ठेवले आहे. स्पाईस फोन्सच्या माहितीप्रमाणे सध्या फीचर फोन वापरत असलेल्या ९0 टक्के मोबईल फोनधारकांपर्यंत स्पाईस फायर वन पोहोचणार आहे. भारतात स्वस्त स्मार्टफोनला मोठी मागणी आहे. त्याच जोरावर मायक्रोमॅक्स, कार्बन यांसारख्या भारतीय मोबाईल उत्पादकांनी मोठी झेप घेतली आहे. गुगलने अशा स्वस्त स्मार्टफोनसाठी अँड्राईड वन हा खास प्रकल्प सुरू करून त्यासाठी कार्बन आणि मायक्रोमॅक्सबरोबर करार केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi