Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘गुगल’ स्मार्टफोन शोधणार!

‘गुगल’ स्मार्टफोन शोधणार!
, शुक्रवार, 24 एप्रिल 2015 (10:33 IST)
तुमचा अँड्रॉइड फोन कुठे हरवला अथवा कुठे विसरून राहिला, तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. कारण तुमचा फोन शोधण्यासाठी गुगलचं सर्च इंजिन तुम्हाला मदत करणार आहे.

गुगलच्या एका ब्लॉग पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कोणतीही व्यक्ती डेस्कटॉपवर गुगल सर्चचा वापर करून हे काम करू शकते. गुगल सर्चवर फक्त ‘फाइंड माय फोन’ असे टाईप करावे लागणार आहे. त्यानंतर लगेचच तुम्हाला तुमच्या फोनचं लोकेशन दिसणार आहे.

मात्र, हे करण्यासाठी तुम्हाला तुमच्या फोनवर गुगल अँपचा नवीन व्हर्जन डाऊनलोड करावा लागणार आहे. तसेच फोनमध्ये लोकेशन सर्व्हिस चालू असणंही गरजेचं आहे, ज्याच्या मदतीने गुगल तुमच्या फोनचं लोकेशन शोधू शकेल. तसेच, या अँपच्या साहाय्याने तुम्ही तुमचा फोन हरवल्यास अथवा चोरी झाल्यास फोन लॉक करू शकता. तसेच फोनमधील डेटाही डिलिट करू शकता.

Share this Story:

Follow Webdunia marathi