Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘होनोर 8’ साठी 4 दिवसांत 50 लाखांहून अधिक रजिस्ट्रेशन

‘होनोर 8’ साठी 4 दिवसांत 50 लाखांहून अधिक रजिस्ट्रेशन
, मंगळवार, 19 जुलै 2016 (13:44 IST)
या आठवडय़ात लाँच झालेल्या ह्युवेई होनोर 8 या स्मार्टने अवघ्या 4 दिवसांतच रेकॉर्ड बनवलाय. कंपनीला या स्मार्टफोनसाठी पहिल्या सेलसाठी अवघ्या चार दिवसांत 50 लाखांहून अधिक रजिस्ट्रेशन मिळालीत. ह्युवेईने टीजर फोटोतून ही माहिती दिलीये. 19 जुलैला या स्मार्टफोनची विक्री सुरु होणार आहे. सध्या हा फोन केवळ चिनी मार्केटमध्ये उपलब्ध आहे. 32 जीबी स्टोरेज आणि 3 जीबी रॅमच्या फोनची किंमत भारतीय बाजारात साधारण 20 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 32 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅमच्या फोनची किंमत 23 हजार रुपये असेल. 64 जीबी आणि 4 जीबी रॅमच्या स्मार्टफोनची किंमत 25 हजार असू शकेल. या फोनचे खास वैशिष्टय़ म्हणजे यात 12 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आलाय. तसेत 5.2 इंचाची फुल एचडी स्क्रीन आहे. यात 1.8 गिगाहर्टझ किरीन 950 प्रोसेसर आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ट्विटरद्वारे मागवू शकता पिझ्झा!