Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'मोटो एक्स'मार्चमध्ये येईल भारतात

'मोटो एक्स'मार्चमध्ये येईल भारतात

वेबदुनिया

PR
'गूगल' आणि 'मोटोरोला' यांचा संयुक्त स्मार्टफोन 'मोटो एक्स'येत्या मार्च महिन्यात भारतात लॉन्च होणार असल्याची माहिती कंपनीच्या सुत्रांनी दिली. 'मोटो जी'ला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाच्या पाश्वभूमीवर गूगलने 'मोटो एक्स'भारतीय बाजारात सादर करण्‍याचा निर्णय घेतला आहे. गूगलतर्फे करण्यात आलेल्या एका ट्‍वीटनुसार 'मोटो एक्स'हा बजेट फोन भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये मार्च महिन्यात लॉन्च करण्‍यात येणार आहे.

गूगलने गेल्या काही दिवसांपूर्वी 'फ्लिपकार्ट'च्या माध्यमातून मोटो एक्स स्मार्टफोन आपल्या भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला होते. या काळात मोटो एक्सला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. परंतु हा फोन गूगलने केव्हा लॉन्च केला याबाबत काहीच खुलासा केला नव्हता.

'मोटो एक्स'हा स्मार्ट फोन 'व्हॉईस असिस्टेंस'फीचरने अद्ययावत आहे. केवळ आवाजाच्या इशार्‍यावर हा फोन ऑपरेट होतो. याशिवाय यात मोशन कॅमरा कंट्रोल फीचर्स आहे. फोनला झटका देताच फोनमधील कॅमेरा ऑटोमॅटीक एक्टिव्ह होतो. तसेच मोटो एक्समध्ये स्मार्टफोन एक्टिव्ह डिस्प्ले फीचर आहे.

पुढे पहा मोटो एक्सचे फीचर.....


webdunia
PR
'मोटो एक्स'मधील फीचर्स...

* 4.7 इंचाचा स्क्रीन
* 720X1280 पिक्सल रेझोल्युशन
* नॅनो सिम
* 2 GB रॅम
* 16 GB/ 32GB इंटरनल मेमोरी
* 130 ग्रॅम वजन
* 10 मेगापिक्सल प्रायमरी कॅमरा
* 2 मेगापिक्सल फ्रंट कॅमरा
* अँड्रॉइड 4.2.2 जेलीबीन ऑपरेटिंग सिस्टिम
* 1.7 GHz ड्युअल कोर प्रोसेसर
* 2200 mAh बॅटरी

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi