Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

251 रुपयांचा फोन बाजारात येण्याअगोदरच कंपनीचे ‘तीन तेरा’!

251 रुपयांचा फोन बाजारात येण्याअगोदरच कंपनीचे ‘तीन तेरा’!
जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन बनवण्याचा दावा करणार्‍या ‘रिंगिंग बेल्स’ या कंपनीचे वासे फिरलेत.. पहिला स्मार्टफोन बाजारात येण्याअगोदरच कंपनी अडचणींमध्ये अडकलीय. रिंगिंग बेल्स कंपनीचे अध्यक्ष अशोक चड्ढा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. आता ते कंपनीत केवळ एक सल्लागार म्हणून काम पाहणार आहेत. कंपनीचे प्रमोटर मोहित गोयल यांच्याशी त्यांचे मतभेद असल्याचं समोर येतंय. आता यापुढे कंपनीचे सर्व निर्णय गोयलच घेतील. इतकंच नाही तर कंपनीच जवळपास 30-35 कर्मचार्‍यांनीही कंपनीला राम राम ठोकलाय. कंपनी सुरू झाली तेव्हा जवळपास 60 कर्मचारी इथं रुजू झाले होते. 
 
251 रुपयांत स्मार्टफोन उपलब्ध करून देण्याचं स्वप्न दाखवलेला हा स्मार्टफोन मार्केटमध्ये आलाच नाही. त्यामुळे, त्यांना डिस्ट्रिब्युटरदेखील मिळालेले नाहीत. अशात कंपनीच्या सेल्स आणि मार्केटिंग टीमनं कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला. सूत्रांच्या माहितीनुसार, कंपनीला फंडिंगासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतंय. 
 
कंपनीलाच प्रत्येक फोनची प्रोक्योरमेंट कॉस्ट जवळपास 1,20 रुपये पडतेय. म्हणजेच, जर 251 रुपयांना फोन विकला तर कंपनीला प्रत्येक फोनमागे 950 रुपयांचं नुकसान सहन करावं लागणार आहे. मात्र, यापूर्वी कंपनीच्या म्हणण्यानुसार, कंपनी प्रत्येक फोनमागे 31 रुपयांचा नफा कमावणार होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गंगाकिनारी सेल्फी काढायला गेल्यास अटक