Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

5,000 रुपये कमी किमतीत मिळणार ‘वनप्लस वन’ स्मार्टफोन

5,000 रुपये कमी किमतीत मिळणार ‘वनप्लस वन’ स्मार्टफोन
, शुक्रवार, 22 मे 2015 (11:46 IST)
‘वनप्लस वन’ स्मार्टफोनचं 64 जीबी व्हर्जन केवळ 16,999रुपयांत मिळणार आहे. बुधवारी दुपारी दोन वाजता ‘ओव्हरकार्ट’ वेबसाइटवर याची विक्री झाली. या फोनची किंमत याची ऑफिशिअल पार्टनर ‘अँमेझॉन’वर 21,998 रुपये आहे. ‘ओव्हरकार्ट’वर 16,999 रुपयात मिळणार्‍या वनप्लस वन फोनला सहा महिन्यांची वॉरंटी दिली जाणार आहे. 
 
याआधी ‘ओव्हरकार्ट’ने शिओमीचे रेडमी 2S आणि रेडमी नोट 4Gचे रिफर्बिश्ड युनिट्स विकले आहेत. ‘वनप्लस वन’ स्मार्टफोन सायनोजेन ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतो. यामध्ये 2.5 GHz क्वॉलकॉम प्रोसेसर, 3 जीबीची रॅम, 5.5 इंच डिस्प्ले, 13 मेगापिक्सल मेन कॅमेरा, 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा, 3100हची बॅटरी आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi