Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नोकिया आणि एअरटेल यांनी 5G सेवा देण्यासाठी एकत्र

नोकिया आणि  एअरटेल यांनी 5G सेवा देण्यासाठी एकत्र
नोकिया आणि एअरटेल यांनी 5G सेवा देण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनी इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) आणि 5G टेक्नॉलॉजी आणण्यासाठी करार केला आहे. यावेळी भारती एअरटेलचे संचालक (नेटवर्क सेवा) अभय सावरगावकर  म्हणाले, 5G आणि आयओटी अॅप्लिकेशन तंत्रज्ञानामध्ये जीवन बदलवण्याची क्षमता आहे. नोकियासोबत काम करून भविष्यातील या तंत्रज्ञानाला ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची तयारी करताना आनंद होत आहे असं ते म्हणाले.  5G मुळे हायस्पीड डेटा देता येईल तसेच या सेवेमुळे नवीन ग्राहक जोडण्यास मदत होईल, असं एअरटेलने सांगितलं. एअरटेलसोबत काम करून 2G, 3G आणि 4G सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचवल्यानंतर आता 5G ची घोषणा करणं आमच्यासाठी आनंदाची बाब आहे असं नोकियाचे भारताचे मार्केटिंग हेड संजय मलिक म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘पेंग्विन रॅनडस हाऊस’ला ओबामा व मिशेल यांच्या बायोग्राफी प्रकाशनाचे हक्क