Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अॅपल वॉचने दिला अलर्ट, वाचले प्राण

76-Year-Old Gaston D'Aquino
७६ वर्षीय गॅस्टन यांच्या  हृदयाचे ठोके वाढले असल्याचा अलर्ट त्यांच्या अॅपल वॉचवर येऊ लागला. ते तातडीनं रुग्णालयात गेले तिथे सगळ्या चाचण्या पार पडल्या. या चाचण्या पार पडल्यानंतर जवळपास ९० % ब्लॉकेज असल्याचं डॉक्टरांनी त्यांना सांगितलं. रुग्णालयात पोहोचण्यासाठी जरा उशीर झाला असता तर हृदयरोगाचा तीव्र झटका येण्याची शक्यता अधिक होती असंही डॉक्टरांनी त्यांना सांगितलं. पण सुदैवानं वेळीच त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया पार पडली आणि त्यांचे प्राण वाचले. जर अॅपल वॉचनं अलर्ट दिले नसते तर मात्र गॅस्टनच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला असता.
 
आजारपणातून बरं झाल्यानंतर गॅस्टन यांनी अॅपलचे विशेष कार्यकारी अधिकारी टीम कुक यांना पत्रही लिहिलं. अॅपलच्या वॉचमुळे माझे प्राण वाचले, असं म्हणत गॅस्टन यांनी अॅपल कंपनीचे आभार मानले आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबईची कामगिरी निराशाजनक, रोहितचा लाजीरवाणा रेकॉर्ड