चिनी स्मार्टफोन कंपनी ओप्पो 19 जूनला आपले पुढील फ्लॅगशिप स्मार्टफोन सादर करणार आहे. ही लाँचिंग पॅरिसच्या लोवुरे म्युझियममध्ये करण्यात येणार आहे. कंपनीने फाइंड सिरींजचे चार स्मार्टफोन आधी लाँच केले असून त्या फोनचे नाव ओप्पो फाइंड7 आणि फाइंड 7ए होते. Oppo Find X चे स्पेसिफिकेशनची माहिती अद्याप मिळाली नाही आहे पण याचे डिझाइन आणि रॅमबद्दल माहिती समोर आली आहे. कंपनीने आधिकारिक रूपेण कुठल्याही स्पेसिफिकेशनची पुष्टी केलेली नाही आहे.
ओप्पो फाइंड एक्समध्ये स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर, 6/8 जीबी रॅम आणि वर्टिकल डुअल रियर कॅमेरा बेकमध्ये देण्याची शक्यता आहे. लीक झालेले फोटोद्वारे अशी उमेद आहे की फोनच्या बेकमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप असेल. त्याशिवाय फोनच्या रियरमध्ये फिंगरप्रिंट सेंसर बघण्यात आलेले नाही. तर म्हणू शकतो की कंपनी याला इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरसोबत आणू शकते. फोटोत फोन बेजल रहित डिस्प्ले व टेक्सचर्ड बेक पॅनल आहे. रिपोर्टनुसार Find X मध्ये 6.42 इंचेचा डिस्प्ले असेल.