Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Infinix चा पहिला 5G फोन येतोय, किंमत 20 हजार रुपयांपेक्षा कमी

Infinix चा पहिला 5G फोन येतोय, किंमत 20 हजार रुपयांपेक्षा कमी
, सोमवार, 20 डिसेंबर 2021 (23:45 IST)
परवडणारी स्मार्टफोन निर्माता कंपनी Infinix आपला पहिला 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च करणार आहे. इन्फिनिक्स इंडियाचे सीईओ अनिश कपूर यांनी इंडिया टुडेशी बोलताना याबाबत खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की हे उपकरण जानेवारीमध्ये येऊ शकते. एवढेच नाही तर या 5G फोनची किंमत 20 हजार रुपयांपेक्षाही कमी असू शकते. सध्या कंपनीकडे फक्त 4G स्मार्टफोनचा पोर्टफोलिओ आहे, ज्याचा कंपनी विस्तार करणार आहे. 
 
अनिश कपूर म्हणाले की कंपनी जानेवारी २०२२ च्या अखेरीस भारतात आपला पहिला 5G स्मार्टफोन लॉन्च करेल. ते म्हणाले की, सध्या, 5G उपकरणांची किंमत 4G फोनपेक्षा जास्त असेल, परंतु देशात 5G सेवा सुरू झाल्यानंतर हँडसेट अधिक परवडणारे होतील. सध्या, असे बरेच वापरकर्ते आहेत ज्यांना 5G सेवा सुरू होण्यापूर्वीच 5G डिव्हाइस खरेदी करायचे आहेत.
 
भारतात एकामागून एक 5G स्मार्टफोन लॉन्च करण्यासाठी अनेक कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे. 5G स्मार्टफोन बनवण्यासाठी कंपन्या डिव्हाइसच्या उर्वरित वैशिष्ट्यांशी तडजोड करण्यास तयार आहेत. जर तुम्ही समान किंमत श्रेणीतील 4G आणि 5G स्मार्टफोनची तुलना केली, तर साहजिकच 4G फोनमध्ये अधिक वैशिष्ट्ये मिळतील. जागतिक बाजारपेठेत सेमीकंडक्टर चिप्स आणि घटकांच्या किमती वाढल्याचा परिणाम स्मार्टफोन उद्योगावरही होत आहे. 
 
येत आहे 55-इंचाचा प्रीमियम स्मार्ट टीव्ही 
कंपनीने 2021 च्या अखेरीस भारतीय बाजारपेठेत 55-इंचाचा प्रीमियम टीव्ही लॉन्च करण्याविषयी बोलले होते. वर्ष संपत आले असले तरी, प्रीमियम टीव्ही लॉन्च करण्याच्या योजना अजूनही सुरू आहेत, जो 2022 च्या पहिल्या सहामाहीत येऊ शकतो. अनिश कपूर म्हणाले की, कंपनीने गेल्या वर्षी एक स्मार्ट टीव्ही सादर केला होता, ज्याला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या अखेरीस किंवा दुसऱ्या तिमाहीच्या सुरुवातीला Infinix 55-इंच प्रिमियम टीव्ही लाँच करणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

YouTube व्हिडिओ पाहून पत्नीची प्रसूती करू लागला, मुलाचा मृत्यू, पत्नी गंभीर