Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एका युवकानं आपलं नाव ठेवलं 'आयफोन 7'

एका युवकानं आपलं नाव ठेवलं 'आयफोन 7'
लोकं आयफोनचे दिवाने असतात हे तर सामान्य बाब आहे परंतु याचा इतका क्रेझ असेल की त्यासाठी एखादा तरूण आपली ओळख बदलेल हे तर नवलच आहे. युक्रेनमधील ओलेक्झांडर दुरीन या तरूणाने स्वत:चं नाव बदलून चक्क आयफोन 7 असे ठेवले.
 
युक्रेनमधील एका दुकानात पहिल्या पाच जणांना आयफोन 7 फ्री देण्यात येईल, अशी ऑफर होती. त्यासाठी आपले नाव बदलून आयफोन 7 ठेवण्याची अट होती. ओलेक्झांडरने तातडीने नाव बदलले. यासाठी त्याला मात्र 2 डॉलर खर्च आला पण मोबदल्यात फोन मिळाला ज्याची किंमत तब्बल 850 डॉलर आहे.
 
या बातमीला आयफोन 7 च्या बहिणीने दुजोरा दिला आहे. हे सगळं खरं असलं तरी यावर विश्वास ठेवणं कठीज जात आहे, असे ती म्हणाली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कलेक्टरने ड्राइवर मागे बसवून स्वत: चालवली कार