Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जिओ अन्य कंपन्यांच्या तुलनेत खूपच जलद

जिओ अन्य कंपन्यांच्या तुलनेत खूपच जलद
, शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017 (09:24 IST)
फायनान्शिअल सर्व्हिसेस अँड रिसर्च फर्म क्रेडिट स्विस एक्विटी रिसर्च यांनी वेगवेगळ्या शहरांत डेटा नेटवर्क(मोबाईल इंटरनेट)साठी केलेल्या सर्वेक्षणात रिलायन्स जिओचं नेटवर्क अन्य कंपन्यांच्या तुलनेत खूपच जलद असल्याचं समोर आलं आहे. या संस्थेनं 30 शहरांत केलेल्या अभ्यासाअंती हा निष्कर्ष काढला आहे. सर्वेक्षणानुसार 80 टक्के शहरांत रिलायन्स जिओ नेटवर्कचे कव्हरेज चांगलं आहे. तर इतर कंपन्यांचं नेटवर्क कव्हरेज फक्त 30 टक्के शहरांत चांगल्या श्रेणीत दाखवण्यात आलं आहे. दुसरीकडे भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडून (ट्राय) रिलायन्स जिओला क्लीनचिट देण्यात आली आहे. जिओची वेलकम ऑफर आणि हॅप्पी न्यू इअर ऑफर ही ट्रायच्या नियमांनुसारच आहे आणि यामुळे ट्रायच्या कोणत्याही नियमांचं उल्लंघन होत नसल्याचं ट्रायने म्हटलं आहे.  ‘ट्राय’ने रिलायन्स जिओला मोफत सेवा चालू ठेवण्यास परवानगी देऊन नियमांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप इतर टेलिकॉम कंपन्यांकडून करण्यात आला होता. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आयटी क्षेत्रातील मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी संबंधित कंपन्यांनी घ्यावी – आ. विद्या चव्हाण