Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Jio यूजर्सला डबल डेटा ऑफर, Motoच्या फोल्डेबल फोनबद्दल जाणून घ्या

Jio यूजर्सला डबल डेटा ऑफर, Motoच्या फोल्डेबल फोनबद्दल जाणून घ्या
, बुधवार, 18 मार्च 2020 (11:44 IST)
motorola razr
Motorola ने Motorola Razr 2019 हा फोल्डेबल स्मार्टफोन लाँच केला. हा फोन 2004 मध्ये कंपनीचा लोकप्रिय ठरलेल्या स्मार्टफोनचं पुनरागमन आहे. फोनच्या प्री-बुकिंगला 16 मार्चपासून सुरूवात झाली असून 2 एप्रिलपासून विक्री सुरू होईल. 
 
फ्लिपकार्ट तसेच निवडक ऑफलाइन रिटेल स्टोअरमधून फोनसाठी प्री-बुकिंग सुरू आहे. मोटोरोलाने या हँडसेटसाठी फ्लिपकार्ट, सिटी बँक आणि जिओसोबत भागीदारी केलीये. 
तर जाणून घ्या काय फायदे आहेत ते- 
Motorola Razr सिटीबँक क्रेडिट व डेबिट कार्डद्वारे खरेदी केल्यास 10,000 रुपये कॅशबॅक ऑफर आहे. शिवाय 24 महिन्यांसाठी ‘नो कॉस्ट ईएमआय’ची ऑफरही आहे. 
जिओच्या 4,999 रुपयांच्या रिचार्जवर डबल डेटा अँड डबल व्हॅलिडिटी ऑफर मिळेल. अर्थात एकूण 1.4 टीबी डेटा आणि 2 वर्षे वैधतेचा लाभ युजर्सना घेता येईल.
याशिवाय कंपनीकडून एका वर्षासाठी आकर्षक डिस्काउंटसह मोटोकेअर अॅक्सिडेंट डॅमेज प्रोटेक्शन प्लॅनही ऑफर करत आहे. फोन खरेदी केल्याच्या 30 दिवसांमध्ये हा प्लॅन खरेदी करता येईल.
 
स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि किंमत-
6.2 इंच फ्लेक्सिबल ओलेड एचडी+ (876×2142 पिक्सल) डिस्प्ले 
डिस्प्ले पॅनल फोल्डेबल 
सेकंडरी 2.7 इंच ओलेड क्विक व्ह्यू स्क्रीन, ज्याचा वापर सेल्फी घेणे, नोटिफिकेशन बघणे, म्यूझिक कंट्रोल व गुगल असिस्टंटसाठी करता येतो. 
क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 प्रोसेसर
6 जीबी रॅम 
नाइट व्हिजन मोड सह 16 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा 
कॅमेऱ्यात ऑटो सीन डिटेक्शन आणि पोर्ट्रेट लायटिंग
5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
28 जीबी इनबिल्ट स्टोरेज मेमरी 
2510mAh क्षमतेची 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली बॅटरी
अँड्रॉइड 9 पायवर कार्यरत
कनेक्टिव्हिटीसाठी 4जी, वाय-फाय 802.11 एसी, ब्लूटूथ 5.0, जीपीएस/ए-जीपीएस, एनएफसी आणि युएसबी टाइप-सी सारखे फीचर्स
 
 
भारतात नव्या Motorola Razr 2019 ची किंमत 1 लाख 24 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुण्यात आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स सुविधा ३१ मार्चपर्यंत स्थगित