Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Moto G51 5G स्मार्टफोन डिसेंबर मध्ये भारतात येऊ शकतो! काय आहे वैशिष्टये आणि किंमत जाणून घ्या

Moto G51 5G स्मार्टफोन डिसेंबर मध्ये भारतात येऊ शकतो!  काय आहे वैशिष्टये आणि किंमत जाणून घ्या
, शुक्रवार, 3 डिसेंबर 2021 (16:49 IST)
Moto G51 5G भारतात डिसेंबर मध्ये लॉन्च होऊ शकतो. Motorola चा नवीन फोन हा कंपनीचा क्वालकॉम स्नैपड्रैगन 480 Plus SoC सह येणारा पहिला फोन आहे, हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत 12 5G बँडच्या सपोर्ट सह येणारा मॉडेल आहे. 5G सपोर्ट व्यतिरिक्त, Moto G51 5G च्या वैशिष्ट्यांमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरे आणि 120Hz डिस्प्ले समाविष्ट आहे. फोन 8GB पर्यंत रॅम आणि जास्तीत जास्त 128GB ऑनबोर्ड स्टोरेजसह येणार.
 मोटोरोलाने अद्याप लॉन्चबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. याआधीच्या अहवालात डिसेंबरमध्ये Moto G51 लाँच करण्याचा सल्ला देण्यात आला होता.
Moto G51 5G किंमत 
या स्मार्टफोन 19,999 मध्ये उपलब्ध असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 5G कनेक्टिव्हिटीसह हा मोटो जी-सिरीजचा किमतीला परवडणारा फोन असल्याचे म्हटले जाते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, कंपनीचा स्वस्त 5G फोन म्हणून देशात Moto G 5G लाँच करण्यात आला होता, ज्याची किंमत 20,999 रुपये आहे. गेल्या महिन्यात, युरोपमध्ये Moto G51 5G लाँच करण्यात आला होता, ज्याची सुरुवातीची किंमत EUR 229.99 (अंदाजे रुपये 19,600).असेल 
भारतातील फोनच्या व्हेरियंटची वैशिष्ट्ये अजून उघड केलेली नाहीत, परंतु युरोपमध्ये Moto G51 5G मध्ये 6.8-इंच फुल-एचडी+ (1,080×2,400 पिक्सेल) मॅक्स व्हिजन डिस्प्ले 20:9 आस्पेक्ट रेश्योआणि 120Hz रिफ्रेश रेटसह आहे. फोन स्नॅपड्रॅगन 480 प्लस SoC प्रोसेसरने 8GB पर्यंत RAM सह येत आहे. एक ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये f/1.8 लेन्ससह 50-मेगापिक्सेल प्रायमरी सेन्सर, 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड शूटर आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो शूटर आहे. Moto G51 5G फ्रंट 13-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा सेन्सर आहे,हा  f/2.2 लेन्ससह जोडलेला आहे. हे 128GB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेज पॅकसह जे मायक्रोएसडी कार्डद्वारे 512GB पर्यंत विस्तारास समर्थन देते. फोनमध्ये 10W चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी देखील आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी जातीच्या दाखल्याची गरज नाही, जाणून घ्या नियम