Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 29 April 2025
webdunia

दिवाळी धमाका : मोटोरोलाची स्मार्टफोनवर भरघोस सूट

Motorola announces new Diwali offer with flat discounts on four of its smartphones
मोटोरोलानं दिवाळीनिमित्त खास फेस्टिव्हल ऑफरमध्ये स्मार्टफोनवर भरघोस सूट दिली आहे. ही ऑफर 14 ते 21 ऑक्टोबरदरम्यान असणार आहे. यावेळी रिटेल स्टोअरमधून देखील स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. मोटोरोलानं ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली आहे.
 
या ऑफरमध्ये मोटो E4,मोटो M,मोटो Z2 Play आणि मोटो G5वर जवळजवळ 4500 हजार रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. मोटोच्या स्मार्टफोनसोबत जिओ नेटवर्कवर 100 जीबी 4जी डेटादेखील यूजर्सला मिळणार आहे. ही ऑफर तुम्ही मोटोरोलाच्या ऑफलाइन स्टोअरमधून स्मार्टफोन खरेदी करुन मिळवू शकता.
 
या ऑफरमध्ये मोटो E4 8,199 रुपयात उपलब्ध आहे. तर मोटो G5 10,999 रुपयात खरेदी करता येईल. तर मोटो Mची किंमत 12,999 रुपये आणि मोटो Z2 प्ले 24,999 रुपयांना उपलब्ध आहे. या स्मार्टफोनवर जिओ ऑफरसोबतच ईएमआयचा देखील ऑप्शन आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

टाटा टेलिसव्हिसेसचे विलिनीकरण