Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रियलमी 3 स्मार्टफोन लाँच

रियलमी 3 स्मार्टफोन लाँच
नवी दिल्ली , बुधवार, 6 मार्च 2019 (14:35 IST)
स्मार्टफोन बनवणार्‍या चीनच्या रियलमी कंपनीने आपला रियलमी हा नवीन मोबाइल फोन भारतात लाँच केला आहे. भारतात या मोबाइलचे दोन प्रकार लाँच करण्यात आले. 
 
या मोबाइलची किंमत 8,999 रुपये आहे. या मोबाइलमध्ये 3 जीबी रॅम, 32 जीबी स्टोरेज आहे. तर दुसर्‍या मोबाइलमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. याची किंमत 10,999 रुपये आहे. या मोबाइलची विक्री 12 मार्चला दुपारी12 वाजेपासून सुरू होईल. कंपनी पुढच्या महिन्यात रियलमी 3प्रो लाँच करणार आहे.
 
या मोबाइलला 6.2 इंच एवढा एचडी+ ड्यूड्रॉप डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे रिझोल्युशन 1520, 720 पिक्सल इतके आहे. तसेच 12एमएम मीडिया टेक हेलो पी70 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा मोबाइल 'डायनॅमिक डार्क आणि रेडिएंट ब्ल्यू' या दोन रंगात मिळेल. तसेच कंपनीने मोबाइलसाठी आयकॉनिक केसही लाँच केलेत. तीन वेगवेगळ्या रंगात हे केस ळितील. केसची किंत 599 रुपये आहे.
 
पॉवरफुल बॅटरी आणि ड्युअल रिअर कॅमेरा
मोबाइलमध्ये 4,230 मेगाहर्टझ इतकी बॅटरी आहे. स्क्रीन बॅटरी ऑप्टिाइजेशनही दिले गेले. मोबाइलच्या मागच्या बाजूला 13 मेगापिक्सलाचा मुख्य कॅमेरा आहे. दुसरा कॅमेरा 2 मेगापिक्सलचा आहे. याशिवाय कॅमेर्‍यात नाइटस्‌केप मोडही देण्यात आला आहे. यामुळे रात्रीचे फोटो अधिक चांगले काढता येतील. तसेच सेल्फीसाठी 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. या मोबाइलला अँड्रॉइड पी वर आधारित कलर 6.0 ओएस देण्यात आली. या मोबाइलमध्ये रायडिंग मोडही देण्यात आला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डची लेट फी वाढणार