Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आता 2 जी- 3जी फोनमध्येही चालणार जिओचा 4जी इंटरनेट

आता 2 जी- 3जी फोनमध्येही चालणार जिओचा 4जी इंटरनेट
रिलायन्स जिओने सांगितले की त्यांचे 4 जी डिव्हाईस आता बाजारात उपलब्ध आहे आणि त्याद्वारे आता कोणत्याही 2जी किंवा 3जी स्मार्टफोनमध्ये या सुविधेचा लाभ घेतला जाऊ शकतो.
 
कंपनीद्वारे जारी केलेल्या स्टेटमेंटप्रमाणे जिओफाय 4जी पोर्टेबल व्हा‌इस व डेटा डिव्हाईस आहे जे हॉटस्पॉट रूपात काम करतं आणि याद्वारे फोन कॉलसह व्हिडिओ कॉल व जिओचे सर्व अॅप वापरले जाऊ शकतात. अर्थात ग्राहकाचा फोन 4जी नसला तरी तो रिलायन्स जिओच्या सर्व्हिसचा फायदा घेऊ शकतो.
यासाठी जिओफायमध्ये सिम लावून ‍ती अॅक्टिवेट करावी लागते. नंतर 2जी किंवा 3जी स्मार्टफोनवर जिओ 4जी व्हा‌इस अॅप्लीकेशन डाउनलोड करून त्याला जिओ नेटवर्कशी कनेक्ट करायचं असतं. 
 
कंपनीप्रमाणे 4जी वोल्टी नसला तरी या डिव्हाईसद्वारे जिओचे ग्राहक इंटरनेट, व्हाईस कॉल, व्हिडिओ कॉल व एसएमएससह कंपनीच्या विभिन्न सुविधा वापरू शकतात.
 
उल्लेखनीय आहे की मुकेश अंबानीची रिलायन्स जिओकडे देशभरात 4जी दूरसंचार सेवा उपलब्ध करवण्याचे लायसेंस आहे. कंपनीने 5 सप्टेंबरला आपल्या सर्व्हिसेसची औपचारिक सुरुवात केली होती आणि अलीकडेच घोषणा केली त्यांच्या ग्राहकांची संख्या पाच कोटीहून अधिक झाली आहे. सध्या कंपनी 31 मार्च 2017 पर्यंत फ्री सर्व्हिस देत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एका चहावाल्याच्या अकाउंटमध्ये 4.8 कोटी रुपये!