सॅमसंगच्या गॅलॅक्सी सिरींजचा आणखी एक फोन Samsung Galaxy A90 बद्दल नवीन माहिती समोर आली आहे. सॅमसंग गॅलॅक्सी ए90 मध्ये 25 वॅट पीडी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. यासह ऑक्टा-कोअर क्वेलकॉम स्नॅपड्रॅगन 7150 प्रोसेसर आणि 6.7-इंच ओलेड डिस्प्ले असेल. सॅमसंगच्या याफोनच्या कथित ग्राफिक्सने बनलेलं फोटोमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की यात एक अद्वितीय स्लाइड आऊट डिझाइन असेल, ज्यात कॅमेरेला रोटेटिंग मॉड्यूलमध्ये जागा मिळेल.
असे म्हटले गेले आहे की Samsung Galaxy A90 मध्ये पॉप-अप रोटेटिंग कॅमेरा आहे. फोटो घेताना कॅमेरा मॉड्यूलला आपण फिरवू शकतो. याचा वापर रीअर कॅमेरा आणि सेल्फी सेंसरसारखे होऊ शकतो.
गॅलॅक्सी ए90चा कॅमेरा 48 मेगापिक्सेलचा राहील. तसेच 8 मेगापिक्सेल कॅमेरा आणि ToF कॅमेरा देखील असेल. यात 1080x2240 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.7 इंच फुल-एचडी+ ओलेड पॅनेल राहील.