Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

6,000mAh बॅटरीसह Samsung Galaxy M32 स्मार्टफोन, 21 जूनला लाँच होणार

6,000mAh बॅटरीसह Samsung Galaxy M32 स्मार्टफोन, 21 जूनला लाँच होणार
, सोमवार, 14 जून 2021 (11:26 IST)
गेल्या अनेक दिवसांपासून सॅमसंगच्या गॅलेक्सी एम 32 स्मार्टफोनबद्दलचे अहवाल समोर येत आहेत. फोनची वैशिष्ट्ये यापूर्वीच लीक झाली आहेत. आता नुकत्याच आलेल्या अहवालात त्याची लाँचिंगची तारीखही समोर आली आहे. हा एक मध्यम श्रेणीचा स्मार्टफोन असेल, जो ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Amazon मार्फत विकला जाईल. अ‍ॅमेझॉन पेजप्रमाणे हा स्मार्टफोन 21 जून रोजी दुपारी 12 वाजता भारतात लॉन्च होईल.
 
Samsung Galaxy M32 फोनची डिझाइन
Amazon इंडियाने फोनशी संबंधित पेज तयार केलं आहे. येथे केवळ डिझाइनच नव्हे तर सॅमसंग गॅलेक्सी एम 32 ची वैशिष्ट्ये देखील उघडकीस आली आहेत. फोनमध्ये U-शेपचे नॉच आणि पातळ बेझल दिसू शकतात. मागील बाजूस, वर्टिकल लाइनिंग असलेले रियर पॅनेल आणि स्क्वेअर क्वाड कॅमेरा सेटअप दिसू शकतो. हे दोन रंगांच्या पर्यायांमध्ये येऊ शकते - ब्लॅक आणि ब्लू.
 
Samsung Galaxy M32 ची संभाव्य वैशिष्ट्ये
फोनमध्ये दिलेले पॉवर बटन फिंगरप्रिंट स्कॅनर म्हणून देखील कार्य करेल. Amazon लिस्टिंग द्वारे कळतं की फोनमध्ये 6.4-इंचाचा AMOLED डिस्प्ले असेल. हा डिस्प्ले फुल एचडी + रेझोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेटसह आहे. फोनमध्ये 6,000 एमएएच बॅटरी दिली जाईल. हे फास्ट चार्जिंगसह असेल की नाही, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती नाही.
 
Samsung Galaxy M32 मध्ये 64 एमपी कॅमेरा सेटअप
फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल, ज्याचा प्राइमरी सेंसर 64 मेगापिक्सेल असेल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. अहवालानुसार, फोन 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज आणि 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज अशा दोन प्रकारांमध्ये येईल. फोनची किंमत 15 हजार ते 20 हजार रुपयांदरम्यान असू शकते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Post Office च्या या योजनेत फक्त 95 रुपये जमा करा आणि तुम्हाला 14 लाख मिळतील, कसं जाणून घ्या?