Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Samsung Galaxy Tab Active 2 लॉन्च, खाली पडला तरी तुटणार नाही...

Samsung Galaxy Tab Active 2 लॉन्च, खाली पडला तरी तुटणार नाही...
, मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019 (15:16 IST)
Samsung ने भारतात आपला Galaxy Tab Active 2 लॉन्च केला. हा टॅबलेट रग्ड डिझाइनसह येतो. लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे Galaxy Tab Active 2 ला मिलिटरी ग्रेड MIL-STD-840G सर्टिफिकेशन दिले गेले आहे, जे याच्या मजबुतीची एक मुख्य ओळख आहे. हा टॅब S Pen इंटिग्रेशन आणि पोगो पिन कनेक्टर सह येतो. त्यासह डेटा सुरक्षेसाठी सॅमसंगने Galaxy Tab Active 2 मध्ये डिफेंस-ग्रेड Knox सिक्योरिटी प्लॅटफॉर्मचा वापर केला आहे. त्याशिवाय Galaxy Tab Active 2 मध्ये संवेदनशील माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन स्पोर्ट देण्यात आला आहे. 3 जीबी रॅम असलेल्या या डिव्हाईसची किंमत 50,990 रुपये आहे. येत्या मार्चपासून त्याची विक्री सुरू होईल.
 
Samsung Galaxy Tab Active 2 मध्ये 8-इंच टीएफटी डिस्प्ले आहे, ज्याच्या स्क्रीन संरक्षणासाठी गौरीला ग्लास 3 वापरण्यात आला आहे. या टॅबलेटमध्ये ऑक्टा-कोर एक्सीनॉस चिपसेट, 3 जीबी रॅम, 16 जीबी इंटर्नल मेमरी आणि अँड्रॉइड 8.1 ओरिओ देण्यात आला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्याने स्टोरेजला 256 जीबीपर्यंत वाढवणे शक्य आहे. हा टॅब 4450 एमएएचच्या बॅटरीसह येतो. या टॅबच्या मागील पॅनेलवर 8 मेगापिक्सलचा रीअर सेन्सर आणि सेल्फीसाठी 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

LIC पॉलिसी असेल तर लवकर करा हे काम, नाही तर अडकू शकतो पैसा...