Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सॅमसंग परत मागवतेय गॅलक्सी नोट-7 मोबाईल

Samsung Galaxy Note 7
, सोमवार, 12 सप्टेंबर 2016 (12:08 IST)
जगामध्ये मोबाईल निर्मिती आणि विक्रीत आघाडीवर असलेल्या सॅमसंगला मोठा धक्का बसला आहे. सॅमसंग निर्मित असलेल्या गॅलक्सी नोट-7 मध्ये काही तांत्रिक बिघाड झाले आहे.त्यामुळे हा मोबाईल अचानक स्फोट घेत आहे. या मधील पहिली घटना अमेरिकेत उघड झाली आहे.
 
फ्लोरिडा शहरात ही  घटना  घडली. नॅथन डॉर्नेचर असं त्या व्यक्तीचं नाव आहे.नॅथनच्या माहितीनुसार, गॅलेक्सी नोट 7 हा स्मार्टफोन त्याने जीपमध्ये चार्जिंगला लावला होता. मात्र त्याचवेळी फोनचा स्फोट झाला. या घटनेत गाडीलाही आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करावं लागलं. या घटनेत फोन आणि गाडीच्या आतील भागाची अक्षरश: राख झाली होती.
 
या प्रकारच्या अनेक घटना जगभरात नोंदविल्या आहेत.तर सॅमसंग कंपनीने आपली चूक मान्य केली असून मोबाईलच्या बॅटरी खराब असून त्यामुळे हे प्रकार घडत आहेत. त्यामुळे कंपनीनं हे सर्व फोन परत मागवण्याचा निर्णय घेतला आहे. जगभरातून 2.5 मिलियन म्हणजे 25 लाख फोन परत मागवले जाणार आहेत. त्याऐवजी दुसरे मोबाईल कंपनी ग्राहकांना देणार आहे. सध्या नवीन ‘गॅलक्सी नोट 7’ ची विक्री थांबवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे कंपनीला १ अब्ज मिलियन डॉलरच नुकसान होणार आहे.
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गुटखा पिचकारीने घेतला युवकाचा जीव