व्होडाफोन इंडियाने अलीकडेच त्याच्या 399 रुपयांचा प्रीपेड प्लॅन अपडेट केला होता. अपडेट झाल्यानंतर कंपनीने अधिक डेटा ऑफर केला होता. व्होडाफोनच्या 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 1.4 जीबी डेटा मिळायचा पण आता कंपनी 1 जीबी दैनिक डेटा देत आहे. आता व्होडाफोनने 396 रुपयांचा नवीन प्रीपेड प्लॅन लॉच केला आहे ज्याची वैधता 69 दिवसांची आहे. तर मग चला व्होडाफोनच्या या प्लॅनबद्दल जाणून घ्या.
* व्होडाफोनच्या 396 रुपयांच्या योजनेचे फायदे :-
व्होडाफोनच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना 69 दिवसांपर्यंत सर्व नेटवर्क्सवर असीमित कॉलिंग मिळेल. या व्यतिरिक्त, या योजनेत 100 दैनिक एसएमएस संदेश देखील मिळतील. यासह व्होडाफोनच्या या योजनेत दररोज
1.4 जीबी डेटा मिळेल आणि व्होडाफोन प्ले अॅपवर ग्राहकांना मोफत व्हिडिओ सामग्री देखील मिळेल. अस वाटतं की व्होडाफोनने या योजनेला आपल्या 399 रुपयांच्या योजने जागी सादर केला आहे कारण 399 रुपयांच्या
योजनेत देखील 396 रुपयांच्या योजनेची सुविधा उपलब्ध आहे आणि याची वैधता 70-84 दिवसांची आहे. काही ग्राहकांसाठी, या योजनेची वैधता 84 दिवस आहे. व्होडाफोनच्या 396 रुपयांची योजना सध्या दिल्ली आणि
मुंबईच्या ग्राहकांसाठी आहे. अशामध्ये रिचार्ज करण्यापूर्वी, आपल्या नंबरवरील विद्यमान योजना तपासा.