चिनी कंपनी शाओमी ने शुक्रवारी चीनमध्ये स्मार्टफोन मी 8 चा एक लहान वेरियंट लाँच केला आहे. हा जगातील पहिला स्मार्टफोन आहे ज्यात नुकतेच लाँच झालेले क्वालकॉम स्नेपड्रॅगन 710 प्रोसेसर देण्यात आले आहे. शाओमीच्या या अत्याधुनिक स्मार्टफोनची किंमत 1,799 चिनी युआन (किमान 18,970 रुपए) आहे. जाणून घ्या या फोनमध्ये काय आहे खास ...
स्मार्टफोन एंड्रॉयड ओरियो आधारित मीयूआई 10 इंटरफेसवर चालतो.
स्नॅपड्रॅगन 700 रेंज असणारे पहिेले स्नॅपड्रॅगन 710 चिपसेटला नुकतेच क्वालकॉम ने लाँच केले होते. यात फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगन 800 सिरींजचे प्रोसेसर असणारे काही फ्लॅगशिप फीचर्स देखील आहे.
शाओमी मी 8 एसई स्मार्टफोनमध्ये ऍपल आयफोन x प्रमाणे एक डिस्प्ले देण्यात आले आहे.
फोनमध्ये कनेक्टिविटीसाठी वीओएलटीई कनेक्टिविटीसोबत ब्लूटूथ 5.0 समेत दुसरे स्टॅंडर्ड फीचर्स आहे.
स्मार्टफोनमध्ये 5.88 इंच एमोलेड डिस्प्ले आहे. फोनमध्ये ड्यूल लेंस रियर कॅमेरा सेटअप आहे जो 12 मेगापिक्सल प्रायमरी सेंसर व 5 मेगापिक्सल सेकंडरी सेंसरने लैस आहे.
सेल्फीसाठी यात 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
फोनची बॅटरी 3120 एमएएचची आहे.